लोकसभेच्या पराभवानंतर उबाठाचे विचारमंथन; सर्कल निहाय पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Jun 2024, 7:32 AM
   

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचार मंथन केले. या निवडणुकीत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे श्रेय जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख, गोपाल दातकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होण्यासाठी कोणती कारनिमिमांसा जबाबदार आहे, याचा शोध घेतला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्कलनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीत पातूर आणि बाळापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सर्कल निहाय चर्चा करून आपली भूमिका मांडली आहे.

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून ४ जून रोजी लोकसभेचा निकाल स्पष्ट झाला असून महाविकास आघाडीची उमेदवार डॉ. अभय पाटील हे या निवडणुकीत पराभूत झाले. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख व गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख सेवकराम ताथोड शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, अकोला पश्चिम शहरप्रमुख राजेश मिश्रा, अकोला पूर्व शहरप्रमुख राहुल कराळे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनिकर, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे,निवासी उपजिल्हाप्रमुख संजय शेळके, पातूर तालुकाप्रमुख रवी मुर्तडकर, बाळापूर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, जिल्हा परिषद संदीप सरदार, पंजाबराव पवार, पंचायत समिती सदस्य गोपाल ढोरे, ऍड. झडपे, सुभाष धनोकार, बाळू पाटील लांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पातुर आणि बाळापुर तालुक्यात झालेले मतदान यावर विचार विमर्श करण्यात आला. यावेळी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख, गोपाल दातकर यांच्यासमोर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आढावा सादर केला आहे. यावेळी जिल्हा परिषद देगाव सर्कलमध्ये दीपक घोगरे, पवन राहणे, विठ्ठल कवडकार, अमोल पाटकर, नारायण गावंडे, निमकर्द येथील अनंता राऊत, विजू धांडे, संदीप ठाकरे, अंदूर येथील ऋषिकेश वाकडे, विजू धर्माळे, अमोल बराटे, भूपेंद्र राजपूत, पारस येथील चंद्रशेखर लांडे, निलेश बिलेवार दिलीप लांडे, संतोष साठे, रवी घोंगे पदाधिकारी, सर्कल प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक तयारीला लागा : आ. नितीन देशमुख

लोकसभा निवडणूक पार पडल्याने या निवडणुकीचा आढावा घेतला तरी शिवसेना जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असल्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आढावा बैठकीत केला आहे. शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले असले तरी नैतिकदृष्ट्या पराभव मान्य करत आगामी निवडणूकला सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहेत.

    Post Views:  62


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व