संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी
बोईसर!नो पार्किंग नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आलेल्या जागेवर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व जप्तीची कारवाई करणार असल्याची आज ग्रामपंचायत व वाहतूक शाखा बोईसर तर्फे आव्हानात्मक रॅली काढण्यात आली.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणारे वरद हॉस्पिटल नवापूर रोड ते बोईसर स्टेशन, बोईसर स्टेशन ते सिडको बायपास हे मुख्य रहदारीचे वाहतूक क्षेत्र बनले आहे. ह्या मुख्य रस्त्याच्या लगत वाहन पार्किंग,फेरीवाले, हात गाडीवाले, टपऱ्या, तसेच दुकानासमोर भाड्याच्या हव्यासापोटी फेरीवाले बसविल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, महिला व शाळेत जाणारे विद्यार्थी ह्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच होणारे वाद ,पॉकेट मार, चेन स्नेकर्स यांना कुठेतरी आळा बसण्याकरिता बोईसर ग्रामपंचायत व पोलीस वाहतूक शाखा बोईसर यांच्या विद्यमानाने आज सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्या व बेकायदेशीर वाहन पार्किंग करणाऱ्यांना दंड होणार अशी रॅली काढून आव्हानात्मक घोषणा केली .
उद्या मंगळवार दिनांक १७ डिसेंबर पासून संबंधितांवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 45 व 53 पो क .1 च्या तरतुदीचे उल्लंघन करीत 1000 रुपये पर्यंत द्रव्य दंडाची शिक्षा होईल आणि सतत चालू राहणाऱ्याला उल्लंघन ज्या कालावधीपर्यंत सतत चालू राहील त्या कालावधीतील प्रत्येक दिवसात आणखी (दोनशे रुपयापर्यंत) असू शकेल. अशी तरतूद नमूद आहे.
कोणावर व कोणत्या कलमाने होणार कारवाई
इमारतीच्या गाळ्यासमोर, दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या दुकानासमोर ,अतिक्रमण करून बसत असलेले फेरीवाले तसेच इमारतीच्या गाळ्या समोर , अतिक्रमण करून उभारण्यात आलेले अनधिकृत शेड अथवा दुकानातील इतर बाहेर लावलेले सामान, चीज वस्तू ही तात्काळ काढून टाकण्यात न आल्यास तसेच रस्त्यालगत अनधिकृत मोटरसायकल व इतर वाहने उभी असल्यास त्यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 53 नुसार दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
रॅली मध्ये सहभागी असलेले...
आज अनधिकृत रस्त्यालगत अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या विरुद्ध आव्हानात्मक रॅलीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख व उपसरपंच निलम संखे, ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे, मा. ग्रामपंचायत सरपंच मनोज मोर,पोलीस वाहतूक शाखेचे अधिकारी सुरेश साळुंखे, बोईसर पोलीस स्टेशनचे विठ्ठल मणिकेरी ( पीएसआय,), बोईसर वाहतूक शाखेचे संदीप नागरे (पीएस आय), दिलीप तरे (ASI) प्रशांत खैरणार (ASI), पो. ह. अमजद सय्यद, मनिष संखे, विनू भुसारे, रसूल कुलाल, संजय लोखंडे, तसेचग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाडा,अजय ठाकूर, पंकज हाडल ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ वसहभागी झाले होते.
Post Views: 15