जागतीक ग्राहक दिनाचे आयोजन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-03-14
   

वर्धा ( किशोर मुटे ) : जागतीक ग्राहक दिनाचे मंगळवार, दि. 15/03/2022 रोजी समाज कल्याण भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे सकाळी 11.30 वाजता आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाच्या  अध्यक्क्षस्थानी मा. पि. आर. पाटील, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अधिकारी वर्धा हे राहणार असून  उद्घाटन मा. श्रीमती प्रेरणाताई देशभ्रतार जिल्हाधिकारी, वर्धा तर  प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. प्रशांत होळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात श्रीमती एम. आर. खनके, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, वर्धा श्री सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा, श्री. पी. जी. कुळकर्णी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, वर्धा, श्री अशोक सावंत, अधिक्षक अभियंता, महावितरण वर्धा श्री संजय वाकडे कार्यकारी अभियंता (प्रशासन), महावितरण वर्धा तसेच श्री किशोर मुटे जिल्हा संघटक अ. भा. ग्रा. प. जिल्हा शाखा वर्धा तथा जिल्हा ग्रा. स.प. वर्धा तसेच श्री अजय भोयर, अ. भा. ग्रा. क. परिषद, वर्धा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मान्यवरांचा सत्कार व त्यांना ग्राहक मित्र पुरस्काराने सन्माननित करण्यात येणार आहे. 

हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग सहा. नियंत्रक वैधमापन (वजन मापे) शास्त्र जिल्हा वर्धा तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखा, वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने होणार असल्याचे श्री विनोद पोटे जिल्हा सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखा, वर्धा यांनी कळविले आहे‌. जागतिक ग्राहक दिनाच्या या  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे‌

    Post Views:  269


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व