अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जयंती साजरी.


 संजय देशमुख  2023-01-12
   

अकोला : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांतजी पवार यांचे निर्देशानुसार मराठा महासंघ जिल्हा शाखा अकोला च्या वतीने दिंनाक १२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता नेहरू पार्क अकोला येथे राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब जयंती साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाचे सुरुवातीला अकोला महानगर महिला अध्यक्षा सौ.अलकाताई देशमुख ,अकोला तालुका अध्यक्षा सौ. रेखाताई देशमुख, अकोला महानगर सरचिटणीस कू. कल्याणी ठाकरे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी सौ. इंदुताई देशमुख ,सौ.वर्षाताई ठाकरे, मीनाक्षी मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले . याप्रसंगी विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे अकोला जिल्हाध्यक्ष, श्री सुरेश ठाकरे अकोला जिल्हा संघटक एडवोकेट अमोल सूर्यवंशी ,मार्गदर्शक के एम देशमुख, अकोला तालुका अध्यक्ष ओम प्रकाश काळपांडे, डॉक्टर शशिकांत पवार, सतीश सुर्वे, सिद्धेश्वर देशमुख , श्री रजुभाऊ वगारे ,युवराज काळबांडे, अश्विन पाटील मुरूमकर, श्री सूचित देशमुख,श्री देवानंद भोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोला तालुकाध्यक्ष ओमप्रकाश काळबांडे यांनी आभार भुजंगराव देशमुख यांनी मानले.

    Post Views:  122


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व