पुण्यातील विद्यापीठ हायस्कूल मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
सांस्कृतिक वार्तापत्र विशेषांकाचे प्रकाशान
पुणे - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याबध्दल प्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पेंडसे यांच्या हस्ते सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक घटना व कृती ही समाजाला प्रेरणादायी ठरणारी आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण आत्मसात करावेत असे सांगितले.
भाषणाची सुरुवात उत्स्फूर्तपणे शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन केली व संपूर्ण जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर आपल्या भाषणातून उभे केले.
ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र पेंडसे यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके शाळेस भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वर चव्हाण यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षिका स्नेहा वाघमारे यांनी केला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, शिक्षक प्रतिनिधी स्मिता जाधव, वैशाली सैंधाणे, संध्या आवेकर, प्रमोदिनी कबुले, तेजस्विनी निरगुडे, मनोहर निकम, गौरी गोळे, रेश्मा देवकाते, पल्लवी अभंग व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 166