पत्रकारांनी भेदभावांना टाळून सद्भावनांनी संघटीत व्हावे..! - संजय एम.देशमुख
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून जल्लोषात पत्रकार दिन साजरा.सर्वांच्या एकत्रीकरणाचा अभिनव प्रयत्न.
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Jan 2026, 1:51 PM
४० पत्रकारांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी व ईतरांचेही सन्मान
अकोला - बदलत्या काळात कोसळणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी अवास्तव अहंभावाने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या भेदभावांनी तिलांजली देऊन लहान मोठी वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल मिडीयातील सर्व पत्रकारांनी संघटीत झालं पाहिजे. संभाव्य गंभीर धोक्यांना ओळखून स्वत:चा स्वाभिमान आणि अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी संघटीत होऊन सद्रभावनांनी एकत्र येणे ही वर्तमानाची खरी गरज आहे.त्यासाठी लोकस्वातंत्र्य चळवळीला महासंघ असे नाव देण्यात आलेले आहे.म्हणून खऱ्या अर्थाने संघटीत शक्तीचे ध्येय गाठण्यासाठी राज्य आणि देशपातळीवरील सर्व पत्रकारांनी भेदापलिकडे विचार करून या समाजाभिमुख राष्ट्रीय प्रवाहात सहभागी व्हावे.असे वास्तव प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अ.भा.समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.
लोकस्वातंत्र्यकडून समाजाला अपेक्षित असणारा पत्रकार कसा असावा या विषयावर परिसंवाद व ४० पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी व ईतरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन संटनेकडून स्नेहपूर्वक सन्मानित करण्यात आले.लहान मोठी वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स आणि डीजीटल मिडीयातील पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत हा पत्रकार दिन साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार कसा असावा आणि समाजासाठी त्याचे काय योगदान असावे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
संघटनेच्या समतावादी धोरणानुसार राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा सन्मान म्हणून घेतलेल्या निर्णयानुसार लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.तर अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार स्तंभलेखक प्रा.मोहन खडसे,सिध्दहस्त पत्रकार महेन्द्र कवीश्वर,अॕड.अनंतराव खेळकर,दिनेश शुक्ल,निशाली पंचगाम,माणिकराव कांबळे,खामगावचे ज्येष्ठ पत्रकार व लोकस्वातंत्र्यचे महाराष्ट्र संघटन प्रमुख जगदिश अग्रवाल,विदर्भ संघटक सागर मोदी यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , कर्मयोगी संत गाडगेबाबा व महपुरूषांना अभिवादन आणि शहिद जवानांसह विविध बळींना श्रध्दांजली वाहण्यात आली. लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवागौरव व लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता सेवा गौरव या राज्यस्तरीय पुरस्कारांनी ४० पत्रकारांना व ईतर पत्रकार बाधवांना शाल व पुष्पगुच्छांनी पत्रकार दिनी सन्मानित करण्यात आले.लोकस्वातंत्र्य विदर्भ अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.किरण वाघमारे व विदर्भ संघटन प्रमुख म्हणून राजेश खारोडे यांना पुरस्कारांसोबतच नियुक्तीपत्र व आय कार्ड प्रदान करण्यात आले.
सौ.जया भारती यांच्या संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,अंबादास तल्हार,सिध्देश्वर देशमुख,पुष्पराज गावंडे,प्रा.डॉ.किरण वाघमारे,राजेश खारोडे,पंजाबराव वर, सागर लोडम,श्रीकृष्ण माळी,दिपक देशपांडे,धनंजय मिश्रा,सतिश देशमुख,गजानन मुऱ्हे,पंकज देशमुख,सौ.दिपाली बाहेकर,बुढण गाडेकर,मनोहर मोहोड,श्रीराम खारोडे,शामराव देशमुख,नारायणराव अंधारे,संभाजीराव टाले,प्रबोध देशपांडे,शैलेंद्र दुबे,गजानन हरणे,नरेन्द्र देशमुख,फुलचंद वानखडे,अमित इंगळे,अजय वानखडे,प्रकाश शिरसाट, डॉ.अशोक शिरसाट,एजाज अहमद,रहेमान खान,गजानन वानखडे,राजू चिमणकर,विजय केंदरकर,श्रीकांत पाचकवडे,अनिल मावळे,राजकुमार उखळकर,शिवराजे जामोदे,दिलीप ब्राम्हणे,संतोष येलकर,अॕड संजय कमल देशमुख,शिवाजी भोसले,विवेक चांदूरकर,अविनाश भगत,नागोराव मोहोड,गजानन थोरात व बहूसंख्य पत्रकार उपस्थित होते.आभारप्रदर्शन सौ.दिपाली बाहेकर यांनी केले.
Post Views: 13