डॉ. गजानन नारे यांना पितृशोक


 विश्व प्रभात  03 Sep 2025, 5:49 PM
   

अकोला:  येथील प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष आणि डॉ. गजानन नारे यांचे वडील श्री. साहेबरावजी नारे यांचे आज बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. 
त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दुपारी १२ वाजता करण्यात आले, तोपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभात किड्स, तोष्णीवाल लेआऊट, येथे ठेवण्यात आले होते. नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले.
           मूळचे अकोट तालुक्यातील विटाळी सावरगाव येथील रहिवाशी असलेले साहेबरावजी नारे सेवानिवृत शिक्षक होते. आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    Post Views:  113


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व