जैन रेस्ट्रोची मतदारांना खास सवलत...‌‌...!


मतदान करणारांना भोजनामध्ये ५० टक्क्यांची सवलत..!
 विश्व प्रभात  18 Nov 2024, 6:12 PM
   

अकोला-- गेल्या अडिच वर्षांपासून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दर महिण्याच्या कार्यक्रमासाठी जैन रेस्ट्रो संचालक व पत्रकार महासंघाचे सहकारी श्री ईश्वर जैन आणि परिवार हे विशेष सहकार्य करीत आहेत‌.त्यांनी आता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करणाऱ्या मतदात्यांना भोजनाच्या संपूर्ण बिलामध्ये ५० टक्क्यांची एक विशेष सवलत कर्तव्यभावनेने जाहिर केलेली आहे. "मतदान करा आणि भोजन बिलामध्ये  ५० टक्के सवलत मिळवा" अशी ही योजना आहे. ती मतदानाचे दिवशी दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत एक दिवसासाठी ठेवलेली आहे.
      जठारपेठ चौकात जनता बॕंकेच्या बाजुला असलेले जैन रेस्ट्रो हे सर्व प्रकारच्या भोजनासाठी  वेगळ्या अभिरूचीने व अत्यल्प दरांमुळे ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले एक सुप्रसिद्ध हॉटेल ठरलेले आहे.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या दर महिन्याच्या विचारमंथन कार्यक्रमात सभासद व उपस्थितांसाठी येथे भोजन व्यवस्था असते. कार्यक्रमातील आतापर्यंतच्या  उपस्थितांनी येथील जेवणाची केलेली तारीफ हेच जैन रेस्ट्रोला उत्कृष्ट दर्जाचे प्राप्त प्रमाणपत्र आहे.योग्य आदरातिथ्यासह उत्कृष्ट व्यवस्थापन आणि भोजनाच्या दर्जामुळे नावलौकिक प्राप्त करणाऱ्या ईश्वर जैन यांचेप्रती  लोकस्वातंत्र्य पदाधिकारी नेहमीच समाधान व्यक्त करीत असतात.

    Post Views:  462


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व