आशिया खंडातील पहिल्या भिलार( महाबळेश्वर )या पुस्तकांच्या गावात शिवराजे जामोदे कविराज यांच्या कवितेचे प्रकाशन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Oct 2022, 10:08 AM
   

तेल्हारा : आशिया खंडातिल पहिल्या पुस्तकांच्या गावात भिलार  (महाबळेश्वर )या निसर्गरम्य गावात शिवराजे जामोदे कविराज यांच्या पुस्तक या कवितेचे प्रकाशन आकोला माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. सुचिता पाटेकर मॅडम यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आकोला जिल्हातील मराठी विषय शिकविणाऱ्या चाळिस शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती होती. दि.९ आक्टोंबरला झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ . सुचिता पाटेकर मॅडम होत्या. प्रमुख उपस्थिती मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे आकोला जिल्हाध्यक्ष संतोष पेठे, कवी निलेश कवडे, प्रेमदास राठोड, मुख्याध्यापक अरविंद गिर्हे, अलका बोर्डे मॅडम, जोशी मॅडम यांची होती. 
भारतातील पहिल्या भिलार या पुस्तकांच्या गावात. (ता . महाबळेश्वर जिल्हा सातारा )प्रकल्प कार्यालयात विख्यात निसर्ग कवी शिवराजे जामोदे सर यांनी ओजश्वी वाणिमध्ये पुस्तक या कवितेचे वाचन करून रसिकांची उत्स्फूर्तपणे वाहवा मिळवली. या प्रसंगी आकर्षक सजावट केलेली त्यांची कविता प्रकल्प कार्यालय प्रमुख राजेश जोख यांना सप्रेम भेट देण्यात आली. भारतातून भिलारला येणाऱ्या हजारो पर्यटकांना ती आता वाचता येणार आहे हे विशेष. 
विद्यार्थी व शिक्षक यांच्या मध्ये वाचनाची व पुस्तकाची गोडी वाढावी, मराठीच्या साहित्य प्रकारांची त्यांना ओळख व्हावी, या मधून मराठीचे भावी साहित्यीक निर्माण व्हावेत या करिता हा अभ्यास दौरा  (शैक्षणिक सहल )काढण्यात आली. किल्ले प्रतापगड, महाबळेश्वर, फुलांचे कास पठार या पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश होता. दि .७ ते १०  आक्टोंबर ला काढण्यात आलेली ही शैक्षणिक सहल आकोला शिक्षणाधिकारी कार्यालय व मराठी माध्यमिक शिक्षक संघ आकोला जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली.

    Post Views:  521


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व