भावसार समाज उप वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शीटाकळी क्षत्रिय भावसार समाज यांचा संयुक्त उपक्रम
वृत्तसंकलन....अनिल मावळे
अकोला : बार्शीटाकळी भावसार समाज आणि विदर्भ भावसार समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन उत्कृष्ट नमुना असणारे हे सर्व कार्यक्रम अनेकांना आश्चर्याचा धक्का देवून गेले बार्शीटाकळी सारख्या छोट्या खेडे वजा नगरपंचायतीच्या छोट्या गावात चार हजार पाचशे नागरीकांचीहजेरी ही आयोजन केलेल्या कामाचा नियोजन सुखद अनुभव घेताना अनेकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मेळावा उत्साहात पार पडला यांची चर्चा झाली स्मरणिका प्रकाशित त्याच दिवशी दीली त्यामध्ये थोड्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र जी नावे सुटली ती आयोजित कमीटी पूर्णपणे स्मरणिका पूर्ण करुन तिचे वाटप करेल. ती चुक प्रिंटीग कंपनीची आहे हेही सांगितले आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया भावसार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर नवले महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय संस्था व विदर्भ भावसार समाज संस्था/यवतमाळ चे अध्यक्ष अनिल गोपाळराव मावळे, महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष राजेश कळमकर , परभणीचे समाज सेवक श्रीराम गर्जे, उज्ज्वल खंबायतकर, बार्शी टाकळी भावसार समाज अध्यक्ष अतुल गोडले दीपक गोडले कुसुमताई गोडले, विलासराव पंतगे, राजुभाऊ ताकझुरे रमेश ताकझुरे बार्शीटाकळी, भावसार समाजाचे सर्वच कार्यकर्ते सिंदखेड मोरेश्वर चे सर्व कार्यकर्ते महिला पातुर समाज अकोला, महीला मंडळ बार्शीटाकळी, भावसार महीला मंडळ, विदर्भातील भावसार समाज संपूर्ण कार्यकर्ते संचालक मंडळ हे होते. समाजातील अकराशे उपवधु-वरांची संकलित अनुरूप नावाची स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
भव्य प्रांगणात दोन डिस्प्ले स्क्रीनच्या मदतीने उपवधू-वरांचा बायोडाटा उपस्थित मान्यवरांसह समाज बांधवांना दाखविण्यात आला. मेळाव्यास उपस्थित असलेल्या उपवधू-वर, पालक व नातेवाईक अशा जवळपास हजारो व्यक्तींची अतिशय अल्प दरात चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था आयोजक समाज बांधवांतर्फे करण्यात आली होती.
समाजातील उपवधू-वरांना व्यासपीठावर बोलावून आयोजकांनी उपस्थितांना परिचय करून दिला.
उपवधू-वर व पालक यांच्यात चर्चा होऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून २० समन्वय कक्षांची विशेष व्यवस्था याप्रसंगी करण्यात आली होती. सदर मेळाव्याचा महाराष्ट्र व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तेलंगाना राज्य, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील हजारो समाज बांधवांनी लाभ घेतला.
सदरील मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शीटाकळी क्षत्रिय व भावसार समाज, उपवधू-वर परिचय मेळावा समिती, भावसार युवा मंडळ, भावसार महिला मंडळ, भावसार सेवा संघ, तसेच सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, महिला मंडळ, व्यापारी, कर्मचारीवर्ग पोलिस यंत्रणा,यांसह आदिंनी परिश्रम घेतले.
यावेळी सुधाकरराव परळीकर, संतोष जवादे, शंकरराव आंबेकर, प्रशांत जुनगडे,पवन लखपती नंदकिशोर खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव परळकर सतिष भावसार,सुरैश मावळे,लोनसने गुरुजी, पंकज भावसार, योगेश भावसार रामकृष्ण गोडले, डॉ अरुण धारस्कर, डॉ धारस्कर पटवारी धारस्कर, मनोहरराव ताकझुरे गणेशसा गोडवे विपुल गोडले,जगदीश भावसार गोपालसेठ भावसार , नारायणराव बंगाळे, याव्यतिरिक्त नागपूर,मोवाड, नरखेड,काटोल जलालखेड,पुसला वरूड, मोर्शी हिवरखेड अमरावती चांदुरबाजार,तळवेल , अचलपूर, परतवाडा,अकोट अकोला बाळापूर पातूर बार्शीटाकळी वैदर्भीय मेळाव्याचे निमित्ताने अनेकांनी हजेरी लावली.
हैद्राबाद, परभणी बराणपुर खंडवा इन्दोर रोहीनखेड, पनज, मुरतीजापुर बडनेरा अमरावती, वलगाव नांदेड नांदुरा बुलढाणा चिखली साखरखेडा,मेहकर, अकोला अकोला पूर्व शेगाव खामगाव माटरगाव, पुसद हातगाव, हदगाव,कर्णाटक आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश येथील सर्व समाज सेवक म्हणून कार्य करणाऱ्या तुकडीच्या प्रमुखाचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले त्या सर्वाचा समावेश या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचें आभार मानले कार्यक्रम प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर नवले अतुल गोडले अनिल मावळे यांचे भाषण परखडपणे मांडलेल्या विचारांचे सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून न्याय दिला सर्व स्तरातील स्त्रियांना समान हक्क या आधारेच स्त्रियांसाठी सर्वप्रकारच्या व्यवस्था केली होती.
यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी आपले परिचय दिले. अनेकांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक अडचणीमुळे आणलं नाही. जे आले त्यांनी फुलं एन्जॉय करत हा वधुवर परीचय मेळावा आठवणींत राहीलं असा साजरा केला. शेवटी शुभेच्छा व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले.
Post Views: 283