महसूल विभागाच्या आशीर्वादावर एस. पी. बिल्डर्सने काटकर ह्या महसुली क्षेत्रात उभारली ४ मजली इमारत


 संतोष घरत  2023-03-30
   

बोईसर - बोईसर येथिल काटकर हया महसुली क्षेत्रामध्ये सरकारी, आदिवासी, व इतर जमिनीवर भूमाफियाने अनधिकृत बांधकाम चा कलश केला असला, तरी त्या कामाकडे प्रशासन डोळे झाक करत असल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे.                                      
काही दिवसापूर्वी महसूल विभागाने बोईसर  दांडी पाडा ,लोखंडी पाडा ,गणेश नगर काटकर , ह्या ठिकाणी आदिवासी व शासकीय जागेवर झालेले अतिक्रमणावर तोडक कारवाई केली परंतु लगेच दुसऱ्या दिवशी त्या कामांना सुरुवात ही झालेली दिसून आली. म्हणजेच एक देखावा म्हणून तोडक कारवाई केली की काय? असा प्रश्न उपस्थित होऊन संशय व्यक्त केला जात आहे.                                      

महसूल विभागान बोईसरने ज्या परिसरामध्ये तोडक कारवाई केली, त्याच भागामध्ये *एस. पी. बिल्डर्स चे मालक पी. बी .गुप्ता चे ४ मजली इमारतीचे काम सुरू असून त्या कामाला कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे बोलले जात आहे . एवढ्या मोठ्या इमारतीचे काम चालू असताना, शासनाने त्या कामावर डोळे झाक करण्याचे काम केलेले आहे हे स्पष्ट दिसत आहे. सदर इमारती करिता लागणारे दगड, खडी, मुरूम व इतर साहित्य वापरताना त्याची रॉयल्टी (परवाना) घेतला आहे की नाही?, नसेल तर किती प्रमाणात शासनाचे नुकसान केले आहे.हे सर्व पाहता सदर इमारतीवर तोडककारवाई न केल्यास, ग्राहकांना इमारती बाबत कोणतीही कल्पना, अथवा परवानगी आहे की नाही? ह्याची शहानिशा न करता, व बिल्डराच्या आमिषाला बळी पडून त्या इमारतीमध्ये सदनिका घेणाऱ्या ग्राहकाची मोठी फसवणूक होऊ शकते . ह्या इमारतींवर, तसेच इतर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभाग कोणता पवित्रा घेतात ह्या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  183


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व