धामणगाव खु. शाळेच्या मुलींना महिला दिनानिमित्त सायकलींचे वाटप


धामणगावातील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीट
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Mar 2022, 8:46 PM
   

Pune : लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरचा स्तुत्य उपक्रम  लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर मार्फत खेड तालुक्याच्या दुर्गम,डोंगराळ व आदिवासी भागातील धामणगाव खुर्द शाळेतील१) सानिका साबळे २)श्रावणी हांडे ३)हर्षदा मेमाणे या गरीब,गरजू व हूशार मुलींना जागतिक महिला दिनाच्या दिवशी चाकण( एकतानगर)येथे सायकल वाटप करून शाळेत दररोज येण्याची पायपीट कायमची थांबविली.तसेच सदर लाभार्थींना सायकल मिळण्यासाठी प्रयत्न करणारे ला.श्री.तापनशेठ कांडगे,ला.श्री.नितिनशेठ वाव्हळ,ला.श्री.शिवराजशेठ नाणेकर इतर सर्व मित्र परिवार व आमच्या शाळेतील आदर्श व उपक्रमशील शिक्षिका श्रीम.दिपालीताई उबाळे मॅडम कार्यक्रमास उपस्थित होत्या.
            अशी माहिती मुख्याध्यापक श्री.संतोष डफळ यांनी दिली.श्रीम.सिंधु भामरे,श्री.रामदास कचरे  शिक्षकांना या शिक्षिकांमध्ये व विद्यार्थी व शिक्षक या उत्साह वाढला आहे. यापूर्वी सफायर क्लबने शाळेसाठी ढोल,ताशा व लेझीम साहित्याची शाळेला मदत दिली आहे.
       शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुरेश हांडे व व्यवस्थापन समितीचे सदस्य,सरपंच,ग्रामस्थ यांनी कौतुक केले.

    Post Views:  261


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व