अकोला जिल्हा प्राथमिक विभागाच्या वतीने ६०% टप्पा अनुदान आदेशाचे वितरण


प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.वैशालीताई ठग मॅडम यांच्या हस्ते टप्पा वाढ आदेशाचे वाटप
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Mar 2023, 8:15 AM
   

* प्राथमिक विभागात अकोला जिल्हा अकोला विभागात प्रथम
अकोला : राज्यातील युती सरकारने राज्यातील अघोषीत व अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा टप्पा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पात्र अघोषित शाळांना २०% तसेच यापुर्वी २०% अनुदान घेणा-या शाळांना ४०% व ४०% अनुदानित शाळांना ६०% टक्के वाढ देण्याकरीता शिक्षणाधिकारी स्तरावर बारकाईने तपासणी करुन वाढीव टप्पा आदेश देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या २ दिवसांपासून सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत बसुन अकोला जिल्हाच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.वैशालीताई ठग मॅडम, उपशिक्षणाधिकारी श्री.राठोड साहेब, कनिष्ठ सहाय्यक श्री.दिनेशभाऊ काटे यांनी काटेकोर पणे शासन निर्णयातील तरतुदी तपासून पात्र असलेल्या शाळांना आज टप्पा वाढीचे आदेशाचे वितरण केले. यावेळी कार्यालयास श्री.अतुलभाऊ भालतीलक, श्री.सुरजभाऊ डाबेराव यांनी मोलाचे सहाकार्य केले.  
        प्राथमिक विभागात टप्पा अनुदानाचे आदेश वितरीत करण्यात अमरावती विभागात अकोला जिल्हा प्रथम ठरल्याबद्दल व शिक्षकांबाबत तळमळ दाखवील्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.वैशालीताई ठग मॅडम, श्री.काटे साहेब, श्री‌.अतुलभाऊ भालतिलक, श्री.सुरजभाऊ डाबेराव यांचे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

    Post Views:  208


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व