किती शेतकरी मरण पावले, माहिती नाही; नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नच नाही ः केंद्र सरकार
नवी दिल्ली : शेतकर्यांनी कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनात किती शेतकर्यांचा मृत्यू झाला, याची कोणतीही नोंद सरकारकडे नाही. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई नाही. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नच उरत नसल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली.
शेतकरी नेत्यांनी दावा केल्याप्रमाणे 700 पेक्षा अधिक शेतकर्यांचा आंदोलनात मृत्यू झाला आहे. लोकसभेत सरकारला विचारण्यात आले की, मृत शेतकर्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे का? यावर कृषी मंत्रालयाकडे शेतकर्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.
विरोधकांचे म्हणणे 700 शेतकर्यांचा मृत्यू झाला
विरोधकांनी नुकसानभरपाईची मागणी करत तीन कृषी कायद्यांना विरोध करताना देशात सुमारे 700 शेतकर्यांचा मृत्यू झाला. या शेतकर्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. या मुद्यावरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेत्यांनाही स्थगन प्रस्ताव पाठवून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.
Post Views: 179