सेवाश्री पुरस्कार स्वीकारताना इरावती लागू व कौशल इनामदार यांचे डोळे पाणावले


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Jun 2023, 12:36 PM
   

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे स्वर काव्य महोत्सव कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार व स्टार प्रवाह फेम अभिनेत्री इरावती लागू यांना २८ मे २०२३ रोजी सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवल्याबाबत सेवाश्री २०२३ हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . मानपत्र , शाल व श्रीफळ  देऊन अभिनेत्री इरावती लागू व संगीतकार कौशल इनामदार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे ,विधीज्ञ मोतीसिंग मोहता ,भारती शेंडे, ब्रिजमोहन चितलांगे , ओमकार गांगडे ,प्राचार्य विजय नानोटी व डॉ.सारिका शाहा उपस्थित होते  . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे कार्य जागतिक दर्जाचे असून अकोल्यासारख्या छोट्या शहरापासून संपूर्ण जगभरात दिव्यांगांच्या शिक्षण ,रोजगार व आरोग्यासाठी हे कार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संगीतकार इनामदार यांनी व्यक्त केले . पुरस्कार स्वीकारताना मी भारावून गेलो आहे . या संस्थेसाठी तन ,मन व धनाने मी सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले असले तरीही सेवाश्री पुरस्काराची बरोबरी कोणता पुरस्कार करू शकणार नाही , कारण या पुरस्काराने माझी दिव्यांगांप्रतीची जबाबदारी वाढवली असून मी मनापासून माझी सेवा अभिनयाच्या व चित्रपट माध्यमातून करणार असल्याची ग्वाही अभिनेत्री इरावती लागू यांनी दिली. या पुरस्कार सोहळ्यात जालना येथून आलेल्या मूकबधिर व दिव्यांग कवी आकाश देशमुख यांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेतर्फे स्वीकारण्यात आले .

    Post Views:  104


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व