प्रशिक्षणार्थींनी अभिनव शिक्षणाची कस्तुरी अंगी बाणावी! - डॉ. गजानन नारे


शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे आयोजन: प्रभातमध्ये व्हिजीट टू इनोव्हेट स्कूल प्रशिक्षणास सुरवात
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 Feb 2023, 5:52 PM
   

अकोला: आजची पिढी सोशल मीडियासोबत आलेली आहे. त्यांचे आकलन बृहद असून त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा प्रवाहीत आहे. त्यांच्या ऊर्जा स्त्रोताला विधायक वळण देण्याचे आव्हान नवीन शिक्षकांपुढे असणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ट शिक्षणतज्ज्ञ आणि प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला द्वारे प्रभात किड्स स्कूल येथे आयोजित नवीन शैक्षणिक धोरणानुरुप उपक्रमशील शाळेला भेट या साप्ताहीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दि. १३ फेबु्रवारी झाले. यावेळी ते बोलत होते.  

      कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव लाभल्या होत्या तर प्रा. पाठक, प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे, व्यवस्थापक अभिजीत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संचालिका सौ. वंदना नारे यांच्या हस्ते शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य देव यांचा तर प्राचार्य वाघमारे यांचे हस्ते प्रा. पाठक यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.         

     विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा करण्याचा पर्याय आता शिल्लक नाही.  तसेच पालकदेखील आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत दक्ष झाले आहेत. शिक्षकांचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनात आदर निर्माण करत असतो. त्यामुळे जेवढे शिकलं तेवढ कमीच असून शिक्षकांनी सतत शिकण्याची वृत्ती कायम जोपसणं गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ नारे यांनी केले. आचार्य विनोबा भावे यांनी सांगीतलेला आड आणि पोहर्‍याचा दृष्टांप्रमाणे शिक्षकांनी आड किंवा पोहरा न होता विद्यार्थ्यांना ज्ञानापर्यंत पोहचविणारी दोर होण महत्त्वाचं आहे. प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी या प्रशिक्षणातून अभिनव शिक्षणाची कस्तुरी अंगी बाणावी ज्याचा सुगंध विद्यार्थ्यांमध्ये दरवळेल असा आशावाद डॉ. गजानन नारे यांनी व्यक्त केला.   

    आजच्या काळात शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोग अवगत करणे आवश्यक असून त्यांनी स्मार्ट होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव म्हणाल्या. प्रभात किड्स स्कूल सातत्याने अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून प्रभात येथे राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचा पुरेपुर उपयोग करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. देव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक शास्त्रविभाग प्रमुख राहुल निलटकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभागाच्या संजीवनी अठराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी अंकीत मेश्राम यांनी केले. प्रभातच्या हिंदी विभाग प्रमुख सविता तापडिया, सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.


    Post Views:  128


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व