पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांना 2022 चा रा.कृ.कणबरकर पुरस्कार जाहीर
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Mar 2022, 8:50 PM
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा.कृ.कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांना जाहीर झाला. 13 एप्रिलला शिवाजी विद्यापीठात सायं.4 वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जाणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. डी टी शिर्के यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रा.कृ.कणबरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे . श्रीमती शालिनी कणबरकर यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करारातून प्राचार्य रा .कृ.कणबरकर पुरस्कारा ची संयुक्त निर्मिती झाली. विद्यापीठाने यापूर्वी शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ.सी.एन.राव, रयत शिक्षण संस्था, निर्माते दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोख १,५१,००० रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दोन वर्ष कोविड मुळे पुरस्कारात खंड पडला. यंदा 2022 चा रा कृ कणबरकर पुरस्कार पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांना जाहीर झाल्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी टी शिर्के यांनी सांगितले. शैक्षणिक कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांची एकमताने निवड केल्याचे निवड समितीचे सदस्य डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले. या पत्रकार बैठकीला प्रभारी कुलसचिव प्रा. व्ही एन शिंदे,प्र कुलगुरू डॉ. पी एस पाटील, डॉ. विभुते,अरुण कणबरकर, एम .एम. साळुंखे उपस्थित होते.
Post Views: 361