नागपूरमध्ये काँग्रेस एक पाऊल मागे, महाविकास आघाडीचं मनोमिलन, बिघाडीच्या चर्चांना फुलस्टॉप?


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2023-01-11
   

मुंबई : विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक (MLC election) जाहीर झालीय. यामध्ये नाशिक (Nashik), अमरावती (Amravati) या दोन पदवीधरच्या जागांचा आणि औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) आणि कोकण (Konkan) शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या जागेसाठी आग्रही होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु होती. कारण महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीवरुन मनभेद असल्याची चर्चा होती. पण या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तीनही पक्षांकडून करण्यात आलाय. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत जागावाटप झाली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर महत्त्वाची माहिती दिली. महाविकास आघाडीकडून अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर मराठवाड्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरेल. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय, तर नागपूरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी देण्यात आलीय. ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज भरलाय अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

अमरावती, नाशिक येथे काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. अमरावती आणि इतर मतदारसंघात अर्ज दाखल केले जातील. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या जागेसाठी एकमताने निर्णय झालाय. शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. इतर कुणी अर्ज भरलाय त्यांच्याशी चर्चा केली जाईल. या निवडणुकीला एकमताने जाण्याचे काम केलं जाईल. आमचं सर्वांचं एकमत झालंय, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

    Post Views:  195


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व