श्रीगोंदा येथे दोन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न एकाचा गल्ला लंपास


तपासात पोलिसांची दिरंगाई
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Jun 2024, 3:17 PM
   

वैभव हराळ : श्रीगोंदा (जिल्हा प्रतिनिधी) : श्रीगोंदा येथील बाजारपेठेत चोरट्यांनी शटर वाकवून आणि तोडून  ३ दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केला.दोन ठीकाणी  ते अयशस्वी झाले तरी त्यांनी प्रथम देवा  मेडीकलचे शटर तोडून तेथून रू ४५००० हजाराची नगदी रक्कम लंपास केली.
       त्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या उत्कर्ष  मोबाईल शॉपी आणि नंतर साई मेन्स वेअरवर ची शटर्स वाकवून सरड्याप्रमाणे सरकत आतमध्ये प्रवेश करून तिथे सुध्दा चोरीचा प्रयत्न केला.पण तिथे मात्र कुलूपं उघडली न गेल्याने त्यांना हार पत्करावी लागली.तेथील मोबाईल शॉपी आणि साई मेन्स वेअरमधील सामान अस्ताव्यस्त करून त्यांनी पोबारा केला.
       दि.१४ जूनच्या सकाळी अंदाजे ३ वाजता चोरांनी या कामाला सुरूवात केली आणि देवा मेडीकलचा गल्ल्यावर हात साफ केले.यातील  तीन चोरांचे चेहरे सी.सी.फुटेजमध्ये साफ दिसत आहेत.ईतर दोन दुकानात चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी त्यांची शटर तोडल्याने या दोन्ही व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान मात्र झालेले आहे.
       याबाबतच्या तक्रारी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला करण्यात आलेल्या असून सी.सी.टी व्ही फुटेजचा आधार असतांनाही पोलिसांनी त्वरीत तपास करून आरोपींना अटक का केली नाही या पोलिसांच्या या निष्काळजीपणाच्या भुमिकेबध्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत.एका छोट्या प्रकरणातच तपासाची एवढी दिरंगाई म्हणजे पोलिसांकडून आपल्या ब्रिदवाक्याशी आणि सामाजिक कर्तव्याशी होत असलेली ही प्रतारणा आहे.चोऱ्या आणि वाढत्या गुन्हेगारीला अशाप्रकारचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असून समाजात विश्वास कायम ठेवून दिलासा देण्यासाठी पोलिसांनी या चोरीच्या घटनेत आणि इतरही प्रलंबित प्रकरणां प्रकरणांमध्ये तातडीने कारवाया कराव्यात अशी श्रीगोंदा ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.

    Post Views:  303


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व