ईलनाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर प्रकाश पोहरे


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Feb 2023, 5:30 PM
   

अकोला - इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक-प्रकाशकांच्या (ईलना) या संघटनेचे अध्यक्ष श्री.परेशनाथजी यांनी अध्यक्षपदाच्या स्वत:हून दिलेल्या राजीनाम्यामुळे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत अकोला( महाराष्ट्र) येथील दै देशोन्नतीने मुख्य संपादक व ईलनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. 

        श्री परेशनाथजी यांनी राजीनामा देऊन गेल्या डिसेंबरपर्यंतच उपाध्यक्ष श्री प्रकाश पोहरे व विवेक गुप्ता यांनी नव्या अध्यक्षांची निवड करावी असा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात केला होता. त्यानंतर त्यांना राजीनामा मागे घेण्याच्या विनंतीही करण्यात आली होती.परंतू त्यांनी तो प्रस्ताव न स्विकारल्याने शेवटी दि.०८ फेब्रू रोजी दिल्ली येथील कॉन्स्टीट्यूशनल क्लबमध्ये उपाध्यक्ष व कोलकात्यातील दै.सन्मार्गचे प्रकाशक - संपादक श्री विवेक गुप्ता यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती‌.यावेळी उपस्थित ११ सदस्यांमधून श्री प्रकाश पोहरे यांनी कार्यवाहक म्हणून हंगामी अध्यक्ष निवडण्यात यावे,व येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात यावी अशी मते  सभाध्यक्ष श्री.विवेक गुप्ता यांचेकडे व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी अकोल्यातील विश्वप्रभातचे संपादक श्री.संजय एम.देशमुख, श्री रविकुमार व अंकित बिष्णोई (मेरठ,राजस्थान ) यांनी संघटनवाढीच्या बाबतित योग्य सुसंवादाअभावी  सभासदांच्या आय कार्ड,पावत्या आणि ईतर अनेक बाबतित मागील काळात असलेल्या गैरसोईसोईबध्दल असमाधान व्यक्त केले.त्या मुद्द्यांची श्री विवेक गुप्ता यांनी नोंद घेतली. यावेळी विश्वप्रभात संपादक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, (अकोला) रविकुमार बिष्णोई, अंकीत बिष्णोई (मेरठ, राजस्थान) संदिपकुमार गुप्ता,सुधीरकुमार पांडा,( ओरिसा) सौ.सरोजीनी आर्गे (कर्नाटक) संजय गुप्ता, संदिप मानवानी, डॉ. अभिषेक वर्मा उपस्थित होते.

    Post Views:  193


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व