तीन दिवसांत तीन टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार


पोलिस अधीक्षकांची कारवाई; आतापर्यंत १०८ गुन्हेगारी टोळ्यांच्या आवळल्या मुसक्या
 संजय देशमुख  10 Feb 2022, 8:50 PM
   

अकोला : दहिहांडा व चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टोळीनंतर आता खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीही दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. तीन दिवसांत तीन गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून जी. श्रीधर यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून आतापर्यंत १०८ टोळ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. 
गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसणेकरिता टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळीवर हद्दपारीची मोहीम अकोला पोलिसांनी उघडली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दहिहांडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीला हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आलेगाव येथील टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली. याच मालिकेत कारवाईची हॅट्‍ट्रिक १० फेब्रुवारी रोजी खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई केली. खदान स्टेशनच्या हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार कुंदन संजय सिरसाट (२५, रा. रमाबाई नगर शिवनी), कुंदन हरिचंद्र शिरकरे (२०, रा. यशोदा नगर, अमरावती) आणि अनिकेत गणेश गडवाल (२०, रा. ढोणे कॉलनी शिवर, अकोला) यांचेवरील गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांचे विरूध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांचे कडे सादर केल्याने तिन्ही गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केल्याबाबत आदेश पारीत केला.

    Post Views:  243


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व