सत्यजित रे फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्युटचा साहिल इंगळे मेरीट लिस्टमध्ये
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Feb 2023, 9:18 AM
अकोला : येथील भारतीय सैनिक मनोज इंगळे यांचा सुपुत्र साहिल इंगळे यांनी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली शैक्षणिक संस्था मेरिट लिस्टमध्ये येवून लौकीक प्राप्त केला आहे. कॉव्हर्ड मॅगझीन २०१९ च्या माहिती नुसार, एइऊघ्, वर्ल्ड बेस्ट फिल्म स्कूलचे स्थान प्राप्त करण्याकरीता देश विदेशातून हजारो विद्यार्थी येतात पण त्या मधील काहीच लोकांना एस. आर.एफ. टी.आय.मध्ये शिकण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते.
परीक्षा आयोजित करणारी संस्था: एइऊघ् आणि इऊघ्घ्- व्ऊ (जॉईंट इंट्रेन्स एक्साम) मध्ये ३ प्रक्रिया असतात, ही परीक्षा वेगवेगळया क्षेत्रामध्ये असते, प्रत्येक क्षेत्रात ११ जागा असतात. प्रक्रिये मध्ये सर्वप्रथम प्रवेश परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाल्या नंतर अभिमुखता प्रक्रिया, त्या नंतर मुलाखत. या सगळ्या परीक्षा उत्तीण झाल्या नंतर विद्यार्थी एस.आर. एफ. टी.आय. मध्ये शिकण्यास पात्र होतो. हजारो विद्यार्थ्यामध्ये साहिल हा प्रोडूसिन्ग फॉर फिल्म अँड टेलेव्हीजण या क्षेत्रात मेरिट लिस्टमध्ये येवून अकोल्याचे नाव झळकावले आहे. साहिल इंगळे यांनी सावित्री बाई फुले पुणे युनिव्हर्सिटी श्.एण् मीडिया अँड कामुनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. साहिलने चित्रीकरणामध्ये चांगलेच काम केले आहे. त्याच बरोबर साहिल हा झी इंटरटेनमेंट इंटरप्रिंसेस या सारख्या मोठ्या कंपनी मध्ये काम करतो. काम करत असताना त्याने एइऊघ्च्या परीक्षे साठी ६ महिन्या आधीच अभ्यास चालू केला़ यशाचे श्रेय तो आई वडिलांना देतो. आणि मित्रांचे प्रोत्साहन त्याच्या सोबतीलो आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला आपल्या मातीतला चित्रपट बनवणायची त्याची मनोमन इच्छा आहे. साहिलच्या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
Connection failed: Operation not permitted