कापशी रोड येथे शिवजयंती निमित्त निघाली मिरवणूक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  21 Feb 2024, 8:59 AM
   

शिंदखेड  : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कापशी रोड येथे श्री शिवभक्त गणेश मंडळ व जय बजरंग मंडळ भव्य मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करून मिरवणुकाला सुरुवात करण्यात आली. 
गावामधून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी लहान मुलींनी छुलवा पाळणा बाळ शिवाजीचा  ह्या गाण्यावर नृत्य सादर करुन जमलेल्यांचे मने जिंकून घेतली. तरुणांनी ही मोठ्या जल्लोषात मिरवणूक मध्ये सहभागी झाले होते यावेळी मंगेश चराटे विजय केवट, गजानन पाकदुणे, गजानन उंबरकर, सुदामा चराटे,  पांडुरंग उंबरकर,संजय केवट, शुभम पोरे, नितीन चतरकर, शुभम केवट, आशिष केवट, ऋषिकेश हरमकार, रवी केवट ,नकुल केवट, ह्रतिक केवट, हर्षल केवट, सागर तिडके, पवन बावस्कर,बंडू रोहणकार, गोपाल उमाळे, सुनील सावके, अभिषेक केवट, संदीप केवट, अभीषेक केवट, अभिषेक चतरकर, सागर पाटील ,कैलास उंबरकर, पवन बिलेवार,ह्रतेश देशमुख, सागर डिवरे, विजय विलेकर आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.

    Post Views:  139


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व