महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिलाश्रम हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग येथे इ.५ वी ते इ.१२ वी च्या विद्यार्थिनींनी भूगोल दिन पंधरवडा साजरा केला. विद्यार्थिनींसाठी भौगोलिक, पर्यावरणीय संदेश देणारी कलात्मक शुभेच्छापत्रे , प्रकल्प तक्ते, फुलांची रांगोळी, काव्य अभिवाचन ,प्रश्नमंजुषा इ. स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच भूगोल दिनाचे माहितीपर पाक्षिकही प्रकाशित करण्यात आले.
सकाळ सत्रातील प्रमुख पाहुण्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अलका काळे यांनी भूगोल विषय दैनंदिन जीवनाशी कसा निगडित आहे हे विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थिनींशी संवाद साधत विशद केले. दुपार सत्रातील प्रमुख पाहुणे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ.वीरेंद्र नगराळे यांनी उत्तुंग शिखर गाठण्यासाठी कोणत्याही ज्ञान शाखेची अट नाही; परंतु कष्टाला पर्याय नाही त्यामुळे मातृभाषेतून आपल्या संकल्पना स्पष्ट करा व प्राप्त ज्ञानाचे उपयोजन करत रहा, शिक्षणाच्या भक्कम पायावर आपल्या आयुष्याची जडणघडण ही शाश्वत होणार आहे असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे यांनी भूगोल विषयाचा इतर विषयांशी असलेला समवाय विविध उदाहरणांद्वारे विशद केला तसेच स्वरचित काव्याद्वारे पर्यावरणाचे महत्त्वही विद्यार्थिनींना सांगितले. उपमुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेतील विविध उपक्रम, स्पर्धा यांची माहिती व भूगोल दिनाचे महत्त्व विशद केले. पाहुण्यांचा परिचय समृद्धी मदने व शैला चोरघे, भूगोल दिन माहिती पर्यवेक्षक संताजी चव्हाण , आभार गौरी गोळे, सूत्रसंचालन प्रेमला बराटे व अश्विनी जाधव यांनी केले. सुनील मदने,केतकी कुलकर्णी, परिणीती कुलकर्णी,कविता चामे, पल्लवी अभंग, अश्विनी पोपकर, हर्षल पंडित, अर्चना झांजे, माया गायकवाड, विजयश्री मस्के, भूमिका तिरोडकर हे भूगोल शिक्षक उपस्थित होते.
Post Views: 1209