सुधीर तांबे यांनी केली कॉंग्रेसची अडचण, एबी फॉर्म मिळून उमेदवारी न करता मुलाला दिली संधी


तांबे यांची राजकीय खेळी काय?
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Jan 2023, 4:57 PM
   

नाशिक : नाशिकमधील पदवीधर मतदार संघात शेवटच्या काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या आहे. या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतांना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये सुधीर तांबे यांनी मात्र आपल्या मुलाला म्हणजेच सत्यजित तांबे यांना कॉंग्रेस कडून एबी फॉर्म मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचे स्वतः सुधीर तांबे यांनी सांगितले. तर दुसरीकडे तीन वाजेपर्यन्त भाजपने आपला उमेदवार कोण असेल ही देखील सांगितले नाही. त्यामुळे नाशिकच्या विभागीय कार्यालयात मोठा सस्पेन्स बघायला मिळाला. तर दुसरीकडे भाजपने देखील सत्यजित तांबे यांना उमेदवारी देऊ केल्याची चर्चा होती. राज्यातील इतर चार ठिकाणचे भाजपने सर्व चित्र स्पष्ट केलेले असतांना नाशिकबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. त्यामुळे तांबे कुटुंबाने मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात असून त्यात कॉंग्रेसला न दुखावता आणि भाजपलाही नाराज न करता सत्यजित तांबे विजयी उमेदवार असण्याची परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे.

नाशिकमध्ये सलग तीन वेळा पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या सुधीर तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करून त्यांनी मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असतांना सुधीर तांबे म्हणाले, कॉंग्रेस पक्षाकडून मी तीन वेळा मी निवडून आलो आहे, विधान परिषदेसाठी हा वेगळा मतदारसंघ आहे. शिक्षक, पदवीधर, डॉक्टर यांचे प्रतिनिधित्व मी केलं. पेन्शन, शिक्षक आणि डॉक्टर यांचे प्रश्न मी कायम हाताळले, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. सत्यजित तांबे यांना कॉंग्रेस कडून एबी फॉर्म मिळाला नाही पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. युवा नेतृत्व आहे, तरुणांना संधी देण्याचे कॉंग्रेसने नेहमीच केले आहे. त्यामुळे माझ्या ऐवजी सत्यजित तांबे हे उमेदवार असतील. भाजपकडून मला ऑफर नव्हती आणि त्यांचा पक्षही मोठा आहे.

    Post Views:  257


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व