प्रभातचा सात्विक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  11 Jan 2023, 5:40 PM
   

अकोला: स्वर्गीय सरलाबाई गहिलोत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातूर येथे आयोजित जिल्हा स्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी सात्विक संजय गरकल याने प्रथक क्रंमाकासह शाळेसाठी फिरता चषक पटकाविला.  
    मंगळवार दि. १० जानेवारी रोजी झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेत सात्विक गरकल याने १८ वर्षाखालील व्यक्तींसाठी सोशल मीडीयावर बंदी आणावी का? या विषायावर अभ्यासपूर्ण विवेचन सादर करुन प्रथम क्रमांक पटकाविला. सात्विक गरकल यास तुळसाबाई कावल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष विजयसिंह गहिलोत, स्नेहप्रभादेवी गहिलोत, मुख्याधापक अंशुमनसिंह गहिलोत यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह आणि शाळेसाठी फिरता चषक प्रदान करण्यात आला.            
    सात्विकला प्रभातच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे, इंग्रजी विभाग प्रमुख राजेश जयराज यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, शाळा समन्वयक मो. आसिफ यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सात्विकचे कौतुक केले आहे.

    Post Views:  228


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व