बोईसर -(संतोष घरत )- जम्बो फिन्वेस्ट ह्या फायनान्स कंपनीच्या जबरदस्ती वसुली करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या , वागणुकी मुळे महिला पडली बेशुद्ध मंगळवार रोजी रामनिया पार्क केशवनगर, काटकर पाडा बोईसर येथील रहिवाशी सतिश श्रीवास्तव ह्यांनी साई शांती बिल्डिंग मधील तिसऱ्या माळ्यावर घर नंबर 303 खरेदी करून विकत घेतला होता, कोरोना काळात धंद्याची मंदी असल्या कारणाने तो जम्बो फिन्वेस्ट ह्या फायनान्स कंपनीकडून घरासाठी घेतलेला कर्ज पूर्ण करू शकला नाही. म्हणून त्या फायनान्स कंपनीने कोर्टाद्वारे घरावरती जप्तीची कारवाई करण्यात आली. ठाणे कोर्टकमिशनर नमिता तातीया मुल्ला, बँकेचे AO रवि चौधरी, बँकेचे वकील व कर्मचारी सोबत आले होते. त्या वेळेस कर्जदार सतीश श्रीवास्तव, पत्नी शोभा श्रीवास्तव व मुलगा ह्यांनी त्याचा पुढे रडून,खूप विनवणी करून हात पाय जोडले की आम्हाला अजून 2ते 4 दिवसाची मुदत दया परंतु त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जबरदस्तीने बाहेर निघून जाण्याचे आदेश देत होते. ही सर्व परिस्थिती बघून सहन करण्याची सहनशीलता शोभा श्रीवास्तव ह्यांची निघून गेली व त्या बेशुद्ध पडल्या.त्या जवळ जवळ अर्ध्या पाऊण तासात शुद्धीवर आल्या. शुद्धीवर आल्यानंतर कोर्टाच्या कमिशनर व बँकेच्या अधिकाऱ्याने त्यांना सव्वा ते एक महिन्याची मुदत दिल्याची माहिती मिळाली. हे जर ते विनवणी करत असतानाच मुदतवाढ दिली असती तर त्या महिलेवर ही अवस्था आली नसती. माणुसकी हा शब्द कुठेतरी हरवला आहे का? असा तेथे जमलेल्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Post Views: 226
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay