विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला : डॉ. स्वाती दामोदरे, डॉ. पृथ्वीराज तौर अनुवादित कवितासंग्रहाचे प्रकाशन


स्त्रीकोश हा भारतीय स्त्री मनाचा अविष्कार - डॉ नारे
 Chief Editor  2021-11-25
   

अकोला: स्त्री साहित्यातून केवळ स्त्रीजीवनाची नव्हे तर लोकजीवनाची देखील प्रचिती घडते. जवळजवळ ३२ भारतीय भाषांमधील निवडक स्त्री कवितांचा अनुवाद डॉ. पृथ्वीराज तौर व डॉ. स्वाती दामोदरे यांनी केला आहे. त्यांच्या स्त्रीकोश या अनुवादित कवितासंग्रहाचे प्रकाशन विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला द्वारे प्रभात किड्स येथे आयोजित एका अनौपचारिक कार्यक्रमात दि.२४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य व विदर्भ साहित्य संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. गजानन नारे होते. त्यांच्या हस्ते स्त्रीकोश कवितासग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
   स्त्रीकोश हा भारतीय स्त्री मनाचा संयत अविष्कार असून या अनुवादित कवितांमध्ये मुळ कवितेच्या आशयाला कुठेही धक्का न लागू देता अनुवाद करण्याचे कसब डॉ. पृथ्वीराज तौर व डॉ. स्वाती दामोदरे यांनी समर्थपणे पेलले असून असून मराठी भाषा सौंदर्याचा साज या कवितांना मनोवेधक बनवित असल्याचे मनोगत डॉ. गजानन नारे यांनी व्यक्त केले.  
    मराठी शिवाय इतर भाषांमधील स्त्री कविता आपल्या मातृभाषेतील वाचकांना वाचायला मिळावी हा या अनुवादित कवितासंग्रहामागील उद्देश असल्याचे डॉ. स्वाती दामोदरे म्हणाल्या. या कवितासंग्रहाची निर्मिती प्रक्रिया त्यांनी यावेळी उलगडून सांगितली.
    तत्पूर्वी, प्रा. डॉ. स्वाती दामोदरे यांचे स्वागत विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला कार्याध्यक्ष सीमा रोठे-शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे सचिव डॉ. विनय दांदळे यांनी केले. संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. सुहास उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय देशमुख दऊतलेखणी कार यांनी केले. .    
      प्रा. निशा बाहेकर, मोहिनी मोडक, सुरेश पाचकवडे, अशोक ढेरे, प्रा. डॉ. गजानन मालोकार, प्रा. दामोदरे, डॉ. दिलीप इंगोले, प्रा. निलेश पाकदुणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

    Post Views:  230


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व