कोविडः आरटीपीसीआरमध्ये दोन पॉझिटिव्ह तर रॅपिड ‘निरंक’


 sanjay deshmukh  27 Nov 2021, 9:32 PM
   

अकोला,दि.27 : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 254 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचे अहवाल पॉ‍झिटीव्ह ले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57895(43284+14434+177झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 334030 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 330388 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3240  नमुने होते. आजपर्यंत एकूण 334030 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 290746 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

दोन पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून ते अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे. तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला  नाही. याची नोंद घ्यावी.

सहा जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57895(43284+14434+177)आहे. त्यात 1139  मृत झाले आहेत. तर 56750 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत सहा  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 114 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.26) दिवसभरात झालेल्या 114 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला

    Post Views:  289


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व