लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ‌ म्हणजे समत्वाने सामाजिकता जोपासणारी संघटना- प्रशांत उकंडे


 संजय देशमुख  2022-08-22
   

अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह समाजातील लहान-मोठ्यांसोबत भेदभावविरहीत स्नेहबंध जोपासून समत्वदृष्ट्रीने सर्वांचाच सन्मान करणारी विधायक विचारांची समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना म्हणून समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना ही ओळख सिध्द केली आहे. असे प्रतिपादन अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕंकेचे व्यवस्थापक तथा प्रशासकीय अधिकारी प्रशांत उकंडे यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा १२ मासिक विचारमंथन व स्नेहमिलन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये संपन्न झाला, याप्रसंगी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संघटनेच्या उपक्रमांच्या अवलोकनातून आपण हे मत व्यक्त करीत असल्याचे सांगून त्यांचेसह प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी-साहित्त्यिक सुरेश पाचकवडे यांनी सुध्दा संघटना व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

                      संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम‌.देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक गाडगे महाराजांना पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार मोहन शेळके यांची अकोला जिल्हाध्यक्षपदावर नियुक्तीची घोषणा करण्यातून येऊन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले. संजय देशमुख यांनी आगामी उपक्रमांची माहिती देऊन संघटना बळकटीकरणाव्दारे विकासाच्या गती वाढविण्याच्या प्रवाहात योगदानाचे सक्रीय होण्याचे आवाहन पदाधिकारी व सभासदांना केले.याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोष हूशे, कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनीही मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी केंद्रीय उपाध्यक्ष किशोर मानकर,सचिव राजेन्द्र देशमुख,सहसचिव डॉ.अनुपकुमार राठी, अंबादास तल्हार, संदिप देशमुख, दऊत-लेखणीचे संपादक विजय देशमुख, अॕड.राजेश जाधव, अॕड. नितिन अग्रवाल, डॉ. शंकरराव सांगळे, मनोज देशमुखविवेक मेतकर, मंगेश चऱ्हाटे, दिपाली बाहेकर, मनोहर मोहोड, अशोककुमार पंड्याव ईतर सभासद उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचलन मनोज देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन विजय देशमुख यांनी केले.

    Post Views:  216


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व