देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती. त्यामुळे त्यांची सुटका होऊन त्यांना दिलासा मिळेल, अशी चर्चा सुरू होती. पण न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम कारावा लागणार आहे.
निलंबित एपीआय सचिन वाझे याने चांदीवाल आयोगाला चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता. पण तरीही मधल्या काळात देशमुख आणि वाझे यांच्या एकाच खोलीतील तासभर भेटीच्या चर्चांना उधाण आले होते. संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पण अनिल देशमुखांना आता 10 जानेवारीपर्यंत तरी जेलमध्येच राहावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
Post Views: 189