श्री. राजु गुल्हाने यांना अमरावती विद्यापीठाद्वारे पी.एच.डी. पदवी प्रदान


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Dec 2022, 8:39 AM
   

अकोला - श्री. राजु गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त, अकोला यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. श्री. गुल्हाने  यांनी अमरावती विभागातील वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांची सामान्य अभियोग्यता व अभिरुची यांचा त्यांच्या शैक्षणिक संपादनावर होणाऱ्या परिणामाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर चिकित्सक व महत्वपूर्ण अध्ययन करून उपयुक्त मार्गदर्शक नोंदी नोंदविल्या आहेत. विद्यापीठाने त्यांच्या उत्कृष्ठ प्रबंधाबद्दल पी. एच. डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांना मार्गदर्शक म्हणून अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालय, सहा. प्रा.  डॉ. अमित ए. गावंडे  यांचे मार्गदर्शन मिळाले. अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात कामगार क्षेत्रात भरीव असे योगदान त्यांनी दिले आहे. समाजातील सर्व बुद्धिजीवी वर्गांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या पदवी करिता त्यांची पत्नी सौ. सविता गुल्हाने, मुले चिन्मय गुल्हाने, वीर गुल्हाने यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदर प्रसंगी श्री. डॉ. राजु गुल्हाने यांनी मा. कामगार आयुक्त श्री. सुरेश जाधव साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. निमा अरोरा,जिल्हाधिकारी महोदया, अकोला आणि श्री. नितीन पाटणकर, अप्पर कामगार आयुक्त, नागपूर यांचे त्यांनी दिलेल्या विशेष प्रोत्साहन बद्दल  आभार मानले आहे. तसेच त्यांचे सहकारी श्री.सतिश तोटावार, श्री. अनिल कुटे, श्री.आनंद भोसले  यांनी श्री. डॉ. राजु गुल्हाने यांचे अभिनंदन केले आहे.

    Post Views:  233


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व