द्रोह वाटत असेल तर केस करा, जिवात जीव असेपर्यंत...
अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Jan 2023, 3:53 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा वाद अद्यापही शमताना दिसत नाही. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना, अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. तुम्हाला द्रोह वाटत असेल, तर करा केस दाखल, या शब्दांत अजित पवारांनी पलटवार केला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत टीका केली होती. याबाबत अजित पवार यांना पत्रकारांकडून विचारणा करण्यात आली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मला पुन्हा पुन्हा हे विषय वाढवायचे नाहीत. मला माझे काम करत राहायचे आहे. आम्ही आमच्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. तुम्हाला जर द्रोह वाटत असेल, तर त्यात केस दाखल करा. ही केस नियमात बसते का? आम्ही जिवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आमच्याकडून कधीही द्रोह होणार नाही. आमच्या पुढच्या १० पिढ्यांमध्येही तसा द्रोह होणार नाही. उगीच त्यांनी काहीतरी बोलायचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Post Views: 158