मुर्तीजापुर तालुक्यातील खरप ढोरे येथील पुरात अडकलेल्या शेतक-याला पिंजर येथील आपत्कालीन पथकाने सुखरुप वाचविले


 संजय एम. देशमुख  19 Jul 2023, 6:52 PM
   


पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने आज सकाळी पाच वाजता पासुन मुर्तीजापुर तालुक्यातील खरप ढोरे आणी चिखली येथे रेस्क्यु ऑपरेशन चालु केले असता यामध्ये खरप ढोरे येथील एक जण येथुन एक की. मी.अंतरावर शेतात अडकलेला होता त्या शेतक-याला रेस्क्यु टीम ने रेस्क्यु बोटीव्दारे सुखरुप वाचवून आणले

मूर्तिजापूर :-  मुर्तीजापुर तालुक्यातील खरप ढोरे आणी चिखली  हे गाव रात्री तीन वाजता पासुन पुराने वेडल्या गेले यात अडकलेल्या नागरिकांना व गुरे ढोरांना काढण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन करीता पिंजर येथील मानव सेवा  आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे (जिवरक्षक) यांना माहीती देऊन तात्काळ मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी अपार सर आणी तहसीलदार बोबडे मॅडम व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब यांनी पाचारण केले 

तेव्हा क्षणाचाही विलंब न करता दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार,अंकुश सदाफळे,ज्ञानेश्वर म्हसाये,शरद महल्ले,मयुर कळसकार,महेश वानखडे, शिवम वानखडे,दिपक गांजरे,ऋतीक सदाफळे,यांचेसह शोध व बचाव साहीत्यासह रेस्क्यु बोट घेऊन चिखली येथे घटनास्थळी दाखल झाले येथील परीस्थिती नियंत्रणात आणुन लगेचच खरप ढोरे येथे रेस्क्यु टीम दाखल झाली येथील परीस्थिती येवढी भयंकर होती की अर्ध्या गावाला पुराने घेरले होते अनेकांच्या घरात पाणी घुसलेले घरेपाण्यात पडलेले होते मोठया प्रमाणावर धान्य पाण्यात गेलेले होते अशा परिस्थितीत सगळे गावकरी भयभीत झाले होते उपविभागीय अधिकारी अपार सर आणी तहसील बोबडे मॅडम यांना गावक-यांची एकच हाक होती की आमचा माणुस एक की.मी.अंतरावरील शेतात रात्रीपासून अडकलेला आहे पहीले त्यांना घेऊन या लगेचच अपार सर आणी बोबडे मॅडम यांच्या आदेशाने रेस्क्यु ऑपरेशन चालु केले पुरात रेस्क्यु बोट टाकली यावेळी पाण्याचा प्रवाह एवढा होता की मधात जाणेही शक्य नव्हते पाण्यात विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत होत्या पुढे पुल अशा अडचणी चा सामना करुन बाजीराव उईके वय अंदाजे (45) वर्ष या शेतक-यास सुखरुप वाचवुन आणले.यानंतर 
गावक-यांना धीर देत या रेस्क्यु टीमने मानवतेचा धर्म दाखवुन मदत कार्य सुरुकेले यावेळी पुर्ण वेळ मुर्तीजापुर चे उपविभागीय अधिकारी अपार सर आणी तहसीलदार बोबडे मॅडमसह नायब तहसीलदार बनसोड साहेबांसह मंडळ अधिकारी तलाठी व मुर्तीजापुर पोलीस अधीकारी पोलीस कर्मचारी हजर होते. अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी दीली आहे.

    Post Views:  139


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व