पत्रकारांना धमकी देणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे गृहमंत्र्यांना निवेदन
 पंकज देशमुख  2022-01-12
   

अकोला : सामाजिक बांधीलकी स्वीकारलेल्या जनसामान्यांचे वृत्तपत्र असलेल्या दैनिक जनमाध्यम वृत्तपत्राचे वृत्तसंचालक अभिराम देशपांडे व अकोला सहसंपादक समीर ठाकूर यांना गुटख्याच्या बातमीवरून गुन्हे दाखल करण्याच्या भ्याड धमकी प्रकरणी उच्चपदस्थ असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना व अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांची चौकशी करून कारवाई करा अश्या मागणीचे निवेदन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांना दिले. 

स्थानिक अमरावती येथून प्रकाशित होणाऱ्या सुप्रसिद्ध जनमाध्यम दैनिकात गुटखा माफिया बाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती. सदर बातमीत उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह असे काही वाटले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित वर्तमान पत्र यांना खुलासा पाठविणे अपेक्षित असता त्यांनी थेट वृत्तसंचालक अभिराम देशपांडे यांना व्हाट्सएपच्या माध्यमातून संदेश पाठवून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, तर बातमीदार अर्थात अकोला सहसंपादक समीर ठाकूर यांना खोटे गुन्हे दाखल करून सहा महिने जेल मध्ये सडविण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. ही अतीशय गंभीर बाब असून निर्भीड पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे. वरिष्ठ अधिकारी वर्गाचे असे वर्तन ही अतिशय चिंतनीय बाब असून अश्या अधिकारी वर्गाची ताबडतोब चौकशी करून कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.

    Post Views:  326


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व