श्रीगोंदा पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच शहरात चोऱ्या टिळक भोस यांचा आंदोलनातून आरोप..!
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील वाड्यावस्यांवर मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू आहे तसेच काष्टी या गावांमध्ये देखील अनेक चोऱ्या झालेले आहेत. मात्र त्यांचा तपास जलद गतीने होत नाही त्यामुळे चोर पकडले जात नाहीत. आणि याचा विपरीत परिणाम होउन चोरांचे मनोधैर्य वाढलेले आहे. श्रीगोंदा शहरात तीन दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठेत बस स्टँड लगत असलेल्या देवकी कॉम्प्लेक्स मध्ये चार दुकाने, तसेच दौंड रस्त्यालगत असणाऱ्या व्यापारी संकुलामध्ये मेडिकल, शेती भांडार, व सलून तसेच महाराष्ट्र बँकेच्या शेजारी असलेले फोटो स्टुडिओचे दुकाने फोडण्यात आले. जवळपास 12 ठिकाणी चोरांनी अत्यंत धाडसी चोऱ्या केलेल्या आहेत. तसेच शिवाजीनगर मध्ये स्वर्गीय उपजिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्या घरी देखील जबरी चोरी करण्यात आली व चोरट्याने दहशत करण्यासाठी व कोयत्या द्वारे घराच्या गेटवर वार करत दहशत माजवली. त्यामुळे श्रीगोंदा शहरातील नागरिक व्यापारी भयभीत झालेले आहेत.
तसेच रहदारीच्या ठिकाणी बाजार तळावरून मोटरसायकल चोरी जाणे शनी चौकातून गाड्या चोरी जाणे मोबाईल चोरी जाणे अशा लहान मोठ्या चोऱ्या देखील सातत्याने घडत आहेत. असे असताना श्रीगोंदा पोलिसांचा चोरांवर कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे चोऱ्यांचे सत्र सुरू आहे महाराष्ट्र बँकेच्या खाली फोटो स्टुडिओमध्ये पहाटे पाच वाजता चोरी करण्यात आली आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. तसेच सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत चोरांनी कुठेही चेहरा झाकण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही म्हणजेच चोर अत्यंत धाडसाने व शिताफीने शटर फोडून लोकांची रक्कम हडप करत आहेत.
असे असताना श्रीगोंदा पोलीस मात्र या विषयात हलगर्जीपणा करीत आहेत. चोरी, दरोडा सारख्या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत का ? असा सवाल व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यत आला. श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शहरांमध्ये गस्त वाढवावी तसेच जनतेचे व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी कठोर व तातडीने उपाययोजना कराव्यात. यासाठी आज श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे टिळक भोस यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री सतीश बोरा, चंदूकाका कटारिया, वैभव मेहता, महावीर पटवा, राहुल कोठारी, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, भाजपा शहर अध्यक्ष धनंजय कोथींबीरे, विनोद खेंडके,विशाल सकट,संग्राम बुणगे, सुरेश नंनवरे गणेश काळे, यांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सतीश बोरुडे यांनी केले.
श्रीगोंदा पोलीस अत्यंत निष्क्रिय आहेत.त्यांचा चोरांवर वचक राहिलेला नाही.पहाटे पाच वाजता चोरी होत आहे.ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.
चोरांचा तपास करण्यात यावा.त्यांना अटक व्हावी तसेच
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मुळे.जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. हप्तेखोरी मुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.
त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी.यासाठी लवकरच आंदोलन करणार आहे.
टिळक भोस
पोलिसांनी व्यापाऱ्यांचे सरक्षण न केल्यास १६ जुलै पासून गाव बेमुदत बंद ठेऊ त्यास श्रीगोंदा पोलीस जबाबदार असतील.
सतीश बोरा, अध्यक्ष व्यापारी संघटना
Post Views: 406