भगवान महावीरांनी मोक्षप्राप्ती व विश्व शांतीचा संदेश जगाला दिला.... ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
कोरेगाव भीमा : राजस जीवन सोडून भगवान महावीरांनी संन्याश्रमाचा अंगीकार केला. अहिंसा ,सत्य, अपरिग्रह , असतेय,व ब्रह्मचर्य यांचे पालन करण्याची शिकवण दिली. जगा व जगू द्या हा मंत्र देऊन शांतीचा संदेश जगाला दिला. भगवान श्रीकृष्णाने गीतेतील अठराव्या अध्याय मध्ये यज्ञ ,दान ,तप ,कर्म हे मनुष्याने करायला पाहिजे हे सांगितले व निष्काम कर्मयोग अर्जुनाला शिकविला आहे. तशीच शिकवण भगवान महावीरांनी जीवनभर दिली. ते जैन धर्माचे तीर्थकर होते. भगवान महावीरांकडे उच्च प्रतीचे यश, वैराग्य, उदारता,लक्ष्मी ऐश्वर्य, ज्ञान हे गुण असूनही त्यांनी मोक्षप्राप्तीचा संदेश दिला. भगवान महावीरांची शिकवण संपूर्ण जगाने अमलात आणणे गरजेचे आहे. भगवान महावीर यांनी मोक्ष प्राप्ती व विश्वशांतीचा संदेश जगाला दिला... असे मत ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार , अपंग सेवक,डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. भगवान महावीर जयंती निमित्त ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्रजी भोळे यांच्या हस्ते महावीरांच्या फोटोचे पूजन व महावीरांच्या जीवनपटावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चंद्रप्रकाश धोका निवासी कर्णबधिर विद्यालय येथील विद्यार्थ्यांची डॉ. रवींद्र भोळे यांनी मोफत तपासणी केली व औषधोपचार केले. तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष कट्यारमल, कर्मचारी ,शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 78