टायपिस्ट संघटने़कडून अॅड. मोतिसिंह मोहता व अॅड. चंद्रकांत वानखडे सन्मानित
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
24 Jan 2023, 5:02 PM
अकोला : बेरार एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी दुसर्यांदा बिनविरोध निवड झाल्याबाबत मुंबई अॅण्ड गोवा बार असोसिएशनचे सचिव अॅड. मोतिसिंहजी मोहता तसेच अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत वानखडे साहेब, बार टायपिस्ट संघटनेकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
अॅड. मोतिसिंहजी मोहता यांचे सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य आहे. तसेच वकीलीमध्ये तर विदर्भामध्ये प्रचलीत आहेत. सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे ते दुसर्यांदा बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
तसेच अॅड. चंद्रकांत वानखडे यांनी टायपिस्ट संघटनेच्या मागण्या मान्य करून दिलेले वचन त्यांनी व बारचे इतर पदाधिकारी उपाध्यक्ष अॅड. चंद्रकांत ढोले, महिला उपाध्यक्षा अॅड. कांचनताई शिंंदे, सचिव विनीत यावलकर व अॅड. धिरज शुक्ला यांनी पुर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
अकोला बारचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. छत्रपती शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आयोजीत केला असून संविधान दिन सुद्धा थाटात संपन्न झाला. तसेच मा. अध्यक्ष अॅड. सी.एन. वानखडे यांच्या अध्यक्षतेखालील अॅड. तुलशान यांनी ५० वर्षे प्रॅक्टीस पुर्ण केल्याबाबत त्यांचा सत्कार सन्माननीय औंरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ति बाळासाहेब मेहरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. तसेच पास्ट विभागातर्पेâ योजनांची माहिती, रोग निदान शिबीर घेवून आजाराची माहिती करून देण्यात आली. रक्तदानासारखे शिबीर राबविले. यावेळी साहित्यीक तथा पत्रकार पंजाबराव वर, ज्येष्ठ टायपिस्ट कमरभाई, क्रांतीताई तेलगोटे मॅडम, संजनाताई बोरकर, सातपुते मॅडम, सोनाली बोरीकर मॅडम, ़कल्याणी गुहे, तारापुरे, प्रफुल ठाकरे, सागर पाटील, संजय इंगळे, मनिष बागडे, सागर सरदार, सोहेल खान, चैतन्य तायडे, पुरुषोत्तम कराळे, पंजाबराव वर, सिद्धार्थ तायडे, हिम्मत तायडे, अजय वानखडे, सागर काशिकर, स्नेहल गवई, संजीव चवरे आदींची उपस्थिती होती. ़कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव वर यांनी तर आभार कमरभाई यांनी मानले.
Post Views: 172