बालकामगार या आनष्ट प्रथेतून महाराष्ट्र राज्य मुक्त करण्याकरीता मा. जिल्हाधिकारी, महादया। अकोला, यांचे अध्यक्षतेखाली कार्यरत जिल्हा बालकामगार कृतीदल मार्फत बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ सधारणा. २०१६ अंतर्गत धाडसत्राचे आयोजन दि. 03/11/2022 रोजी पातुर, जि. अकोला येथे आयोजीत करण्यात आले होते. त्यानुसार दि. 03/11/2022 रोजी मा. सहाय्यक कामागर आयुक्त, अकोला तथा सदस्य सचिव जिल्हा बालकामगार कृतीदल, अकोला श्री. रा. दे. गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गौरव कुमार नालिंदे सरकारी कामगार अधिकारी, अकोला तसेच श्री. विनोद जोशी. दु. नि. व श्री. किरण राठोड दु.नि. तसेच कृतीदलाचे सदस्य श्री. मयुर दि. उमाळे, पो.कॉस्टेबल व श्री. नितीन अहीर यांच्यासह 03/11/2022 रोजी रामदेव रायका, राजस्थानी धाबा, ता. पातुर जि. अकोला येथे जिल्हा बालकामगार कृती दलाद्वारे धाड टाकुन, येथील 01 बाल कामगाराची मुक्तता करुन आस्थापना मालक श्री. सुरेश रुपाराम बिष्णोई यांचे विरुद्ध पातुर शहर पोलिस ठाणे, ता. पातुर जि. अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्त व्यापारी व औद्योगिक आस्थापना मालकांना आवाहन करण्यात येते कि, कुणीही बाल कामगार कामावर ठेवु नये, अन्यथा त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन श्री. रा. दे. गुल्हाने, सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला यांनी केले आहे.
Post Views: 148
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay