भारताचा सुसंस्कृत वारसा टिकविण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी : डॉ रविंद्र भोळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Oct 2022, 12:41 PM
उरुळीकांचन : भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती तर होतेच परंतु महान विचारवंत, थोर शास्रज्ञ, प्रतिभासंपन्न लेखक, श्री रामभक्त , महान राष्ट्र भक्त होते. डॉ कलाम ह्यांचे स्मृतीप्रीत्यर्थ वाचन प्रेरणा दिन साजरा करणे म्हणजे देशातील अमूल्य ग्रंथांचे वाचन करणे होय. भारताचा सुसंस्कृत वारसा टिकविण्यासाठी अनमोल ग्रंथांचे वाचन नियमित करून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार व डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. रविंद्र भोळे शांतिनिकेतन ग्रंथालयाच्या वतीने भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती व राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी वाचनसंस्कृती वाढावी ह्यासाठी मुलांना पुस्तके भेट देण्यात आली. गेली बारा तास वर्षेपासून शासनाची कोणतीही मदत,अनुदान न घेता स्वयंस्फूर्तीने रविंद्र शांतीनिकेतन ग्रंथालय वाचकांसाठी मोफत सुरू असून ग्रंथालयात हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केसरी वृत्तपत्राचे पत्रकार अमोल भोसले , अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष सुनील अंकुश तुपे , सौ संगीता रविंद्र भोळे व सभासद उपस्थित होते
Post Views: 222