भूमी पावन संतांची
इथे वारसा विरांचा
निष्ठा देश रक्षणार्थ
सडा कैकांच्या रक्ताचा......१
दोन हिरे चमकती
दान शिवबा भिमाचे
माथा टेकून पुजतो
भाग हे महाराष्ट्राचे....२
आन माझी महाराष्ट्र
शान तिरंगा अमुचा
मान थोर पुरुषांना
गान निधळ्या छातीचा....३
समभाव बंधुतेची
धूळ कपाळी लावून
द्वेष ,वैर विसरावे
जपू कर्तव्य मानून......४
धर्म,पंथ,जात नको
विवेकाने च वागावे
प्राणी,पशु,वृक्ष,सत्य
नदी ,निसर्ग जपावे......५
राजा पोशिंदा जगाचा
साही दुःख निसर्गाचे
करू नष्ट प्रदूषण
मोती पीक हरिताचे....६
अनिता देशमुख नांदुरा (बुलढाणा)
ह.मू. कल्याण
Post Views: 251