अन्याया विरुद्ध बंड करून विज्ञानवादाकडे वाटचाल म्हणजेच बुद्ध धम्म होय : डॉ. सचिन सावळे
न्यू महसूल कॉलनी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
06 Oct 2022, 6:17 PM
अकोला : अन्याय विषयमते विरुद्धच्या सिमा ओलांडून बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञानवादी व मानवतावादी जीवनाकडे वाटचाल करणे म्हणजेच बुद्ध धम्म होय हीच खरी धम्मक्रांती असल्याचे प्रतिपादन आयुर्वेद डॉ. सचिन सावळे यांनी न्यू महसूल कॉलनीतील धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमामध्ये बोलतांना केले.
ेकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जे.जी. वाहुरवाघ होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. अमोल भगत, डॉ. सचिन सावळे, डॉ.अजय सुर्वे, डॉ. सुमेध धुळधुळे, डॉ. धर्मेंद्र राऊत, डॉ. अविनाश तेलगोटे, डॉ. दिलीप सराटे, डॉ. नितीन वरठे, डॉ. उमेश गडपाल, खंडारे साहेब, उत्तमराव इंगळे, डॉ. आशिष इंगळे, डोंगरे साहेब होते. डॉ. सुमेधा इंगळे, डॉ. तृप्ती भ. तायडे, डॉ. प्रियंका दंदी, डॉ. रवि खंडारे, डॉ.अजय सुरवाडे,डॉ. सतीश पडघान, डॉ. इंगळे होते. सर्व दानदात्या डॉक्टर मंडळीचे व पाहुण्यांचे यावेळी सत्कार करण्यात आला. पाहुणे म्हणून शंकरराव लंगोटे, प्रवीण किसनराव हुंडीवाले, गणेश अंधारे माजी उपसभापती, सुरज अंधारे, सेनेचे मा. नगरसेवक मंगेशभाऊ काळे यांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व प्रथम त्रीशरण पंचशिल घेण्यात आले, महामानवाच्या प्रतिमा पुजनानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. संविधानाची अंमलबजावणी झाल्यास हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, बौद्ध धम्म हा जात-पातीला मानत नाही, व उच्च निचतेला तिथे थारा नाही तोच धागा संविधानामध्ये आहे, सर्वांनी संविधान अंगिकारल्यास देशातील जाती व्यंवस्था नष्ट होऊन देश प्रगतीपथावर ़जाईल असे प्रतिपादन सर्जन डॉ. अविनाश तेलगोटे यांनीकेले.
सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धामध्ये एक लाख लोक मरण पावले, या युद्धानंतर दुष्काळ व महामारीमुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या लाखांवर गेली.कलिंग युद्धाआदी सम्राट अशोक ३१ वर्षे राज्य करीत होता. या महान आपत्तीचा सम्राट अशोकाच्या हृदयावर मोठा परिणाम झाला, अशोकाने हिंसा सोडून अहिंसा व मानवतावादी बौद्ध धम्म स्वीकारला, शस्त्रांतांच्या विजयाऐवजी धर्म-विजयच्या मार्गावर चालला. धम्माचा जगभर प्रसार केला, सम्राट अशोकाने ज्या दिवशी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली तो दिवस सम्राट अशोक विजयादशमी असल्याचे प्रतिपादन किडनी स्पेशालिस्ट डॉ. अमोल भगत यांनी केले.
जगाला युद्धाची नव्हे तर बुद्ध विचाराची गरज असून महामानवाच्या विचाराने चालून त्यांना डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. सुमेध धुळधुळे यांनी बोलतांना व्यक्त केले व सर्व बौद्ध उपासक-उपासिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. वरठे , दिगंबर वाकोडे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले.
विमलताई खंडारे यांनी स्वागतगिताने कार्यक्रमाला सुुवात केली व प्रास्ताविक ज्ञानदेव खंडारे यांनी तर संचालन साहित्यीक पंजाबराव वर यांनी व आभार प्रदर्शन ओरा चक्रे सर यांनी मानले. कार्यक्रमाला एकनाथ सिरसाठ, दिगंबर वाकोडे, वासुदेवराव चक्रनारायण, ज्ञानदेव खंडारे गुरुजी, ओरा चक्रे सर, मेजर प्रकाश गवई, भारत ठोंबरे, सुभाष इंगळे, सुमेध वाकोडे, दादाराव वाहुरवाघ, अॅड. एकनाथ चक्रनारायण, अॅड. अमोल चक्रे, अॅड. विजय वानखडे, गोवर्धन अभ्यंकर साहेब, अशोक गावंडे, समाधान जामनिक, दिनेश सरदार, ओरा चक्रे सर, तायडे साहेब, रामदास चक्रनारायण,सतीश पाटील, प्रमोद इंगळे, प्रकाश दामोदर, सिद्धार्थ वानखडे, मेजर जंजाळ साहेब, विक्की पर्वतकर, अमोल अंबादास तेलगोटे, पडघामोल सर, रामकुमार खंडारे गुरुजी, पाटील साहेब, मनिष गवई व माता-भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post Views: 123