रेटवडी येथे अवतरली पंढरी


 विश्वप्रभात  13 Jul 2024, 7:43 PM
   

पुणे -जि प प्राथ शाळा रेटवडी येथील शाळेमूळे गावात पंढरी अवतरली. विठ्ठलाच्या वेशभूषेत इयत्ता पहिलीचा शौर्य पवळे, रखुमाईच्या वेषात इयत्ता पहिलीची खुशी टाकळकर यांनी सहभाग घेतला. दिंडी  संपूर्ण गावातून काढल्याने ग्रामस्थांना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाले. दर्शन घेण्यासाठी गावातील घरापुढे रांगोळ्या व औक्षण करुन दर्शन घेतले. श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये भक्तांबरोबर आरतीचा व अभंगांचा आनंद लुटला.गावातील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज येथे आनंद घेताना विद्यार्थ्यांनी फुगड्या, बसफुगड्या व रिंगण धरीत,ग्यानबा तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या घोषणा दिल्या. दिंडी कोल्हेवस्ती, सडकवस्ती, मदारवस्ती व गावठाण येथून काढण्यात आली.
   विद्यार्थ्यांना खाऊ वाटप श्री स्वामी समर्थ मठाचे महाराज विजय कावळे, स्वामीभक्त लक्ष्मण तांबे,विठ्ठल पवळे, जयसिंग डुबे चेअरमन श्री रोकडोबा दूध संघ, अश्विनी डुबे शालेय व्यवस्थापन समिती सदस्या, रघुनाथ काळे हॉटेल व्यवसायिक, मुक्ताबाई वाबळे अध्यक्षा श्रीधरराव वाबळे माध्यमिक विद्यालय यांनी चॉकलेट,बिस्कीट पुडे, भेळ यांचे वाटप केले. शिवाजी वाबळे श्रीराम कृषी ॲग्रो यांनी विद्यार्थ्यांना केळी वाटप केली. कार्यक्रमास शुभेच्छा पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे,तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,केंद्रप्रमुख विजय सुरकुले,वैशाली पवार शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष अमित गोसावी, ग्रामपंचायत सदस्य किरण पवार यांनी दिल्या. कार्यक्रमाची व्यवस्था मुख्याध्यापिका सुखदा जगताप,सुनिता पवार,ज्योती सांडभोर,रोहिदास मांजरे, विजयकुमार शेटे,स्मिता पवार,संजय पवार यांनी पार पाडली.

    Post Views:  364


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख