न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पाणथळ दिवस साजरा : शिक्षणाधिकारी
अकोला : अकोला यांच्या परिपत्रकानुसार तसेच अकोला निसर्ग कट्टा व महाराष्ट्र पक्षी मित्र सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज शाळेत जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी त्यानिमित्ताने डिजिटल क्लासरूम मध्ये विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे पाणथळावरील पक्षी यांची माहिती पर्यावरण शिक्षक श्री नंदकिशोर थुटे सर यांनी विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करण्याच्या दृष्टीने त्यांना आपल्या अवतीभवती असलेल्या पर्यावरणातील विविध घटकांची माहिती दिली.
पर्यावरणातिल प्रत्येक घटक कशा पद्धतीने जैवविविधतेचे अन्नसाखळी चालवतो एक दुसर्याला कसे मदत करतो एक दुसर्यावर ते कसे अवलंबून असतात याविषयी माहिती सांगितली निसर्गातील प्रत्येक घटक आणि पर्यावरण हे कसे एकमेकावर कसे विसंबून आहेत याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक पीपीटी द्वारे त्या परदेशी पाहुणे पक्षी यांचे आपल्या पाणथळ्यावर शेततळ्यावर, तलाव, धरणाच्या ठिकाणी त्यांचे आगमन होते ते विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतूहलाने व उत्साहाने पक्षांची माहिती संकलित केली.
आज पाणथळ दिवस जनजागृती होण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री माधव मुनशी सर पर्यवेक्षिका दंडे मॅडम शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका अलका मुंडे मॅडम, मनोज वाकोडे सर तसेच शाळेतील इतर शिक्षक शिक्षिका यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांपर्यंत पाणथळ दिवस 02 फेब्रुवारी आणि पाणथळा वर येणारे पक्षी त्यांची माहिती पोहोचवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
Post Views: 277