निष्काम कर्मयोगी,युगपुरुष नरेंद्र मोदीजी महान राष्ट्रभक्त : डॉ. रविंद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Oct 2022, 12:52 PM
   

उरूळीकांचन :  राष्ट्राचे नवनिर्माते, भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ह्यानी देशाची सर्व क्षेत्रातील अधोगतीला आलेली परिस्थितती सावरुन देशात नव चैतन्य निर्माण केले आहे.भारताची अस्मिता जगात वाढवून प्रत्येक भारतीयाची मान उंचावेल असे न भूतो न भविष्यति असे कार्य केले आहे.असे महान निष्काम कर्मयोगी वाटचलीतून गीतेतील निष्काम कर्म योग साधला आहे.प्राचीन काळापासून ऋषि,मुनि,योगी,तपस्वी, असे शब्द अनेक वेळा आपल्या ऐकनण्यात येतात.आपण अशा व्यक्ति बघितल्या नाही,परंतु ह्या शब्दांनी ओतप्रोत भारून गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पंतप्रधान नरेन्द्र मोदिजी होय. देशात राज्य घटनेची अमंलबजावणी करून राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच विविध क्षेत्रात आमुलाग्र बदल करून क्रांती केली. सर्व सामान्य जनतेला नवीन ऊर्जा निर्माण करून दिली, नव चैतन्य निर्माण  केले. निष्काम कर्मयोगी कार्य करून पूज्यनीय झाले.निष्काम कर्मयोगी, युगपुरूष नरेन्द्र मोदीजी महान राष्ट्रभक्त आहेत. असे मत जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.  

नरेंद्र  मोदीजी ह्यांचा वाढदिवस व सेवासप्ताह कार्यक्रमानिमित्ताने विद्यार्थ्याना खाऊ वाटप व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हया प्रसंगी डॉ रविन्द्र भोळे यांनी आपल्या भाषणातून  विद्यार्थ्याना बहूमोल मार्गदर्शन केले. डॉक्टर रविंद्र भोळे पूढे म्हणाले की कोरोना कलावधित पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी ह्यानी डॉक्टरांना व भयभित जनतेला आधार दिला. बहुमोल मार्गदर्शन केले.यामुळे ते गरीबांचे  देवदूत ठरले.या कार्यक्रमाचे आयोजन मणिभाई मानव सेवा ट्रस्ट नीति आयोग संलग्नित संस्थेचे अध्यक्ष व सरस्वती शालेचे उपाध्यक्ष डॉ रविन्द्र भोळे यांनी केले. कार्यक्रमाला सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर,सौ. मेमाने,श्री कुंजीर,सौ. कांबले, सौ.धीवार उपस्थित होते.

    Post Views:  262


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख