भाजपकडून नवरात्रोत्सवात कात्यानी देवी व कन्या पूजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2022-10-01
   

अकोला : नवरात्र शक्ती भक्ती श्रद्धा सोबत अध्यात्मामध्ये महत्त्वाची असून ऊर्जा निर्माण करणारी संस्कृती तसेच मा दुर्गा यांच्या भक्तीचे प्रतीक मध्ये विश्वाच्या चराचरात निरंतर वास असल्यामुळे कन्या पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्राच्या पर्वावर केवळ पाणी पिऊन उपास करतात. अठारातास सतत काम करतात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सेवा समर्पण कार्यक्रमात वीर भगतसिंग नगरात भाजपातर्फे मातृशक्ती जागर कार्यक्रमात अकराशे एक कन्या उपस्थित राहून सामाजिक संस्कृती संवर्धनाचा कार्य केल्याचे प्रतिपादन अकोला भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले. भारतीय जनता पार्टी महानगर व भाजपा महिला आघाडी तसेच पश्चिम दक्षिण मंडळ च्या वतीने नवरात्राच्या कात्यानी देवी चे पूजन करून सहाव्या दिवशी चे महत्व लक्षात घेऊन कन्या पूजन कार्यक्रम करण्यात आला माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा आगळावेगळा कार्यक्रम महानगरात करण्यात आला या कार्यक्रमात शिवनगर शिवाजीनगर शिवसेना वसाहत गाडगे नगर हरिअर पेठ गंगा नगर गीता नगर या भागातील कन्या यांनी उपस्थिती दर्शवून बाळापूर नाका या भागातील मातृशक्तीने घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात आशीर्वाद प्रदान केले यावेळी महाआरती करण्यात आली.


 यावेळी संजय जीरापुरे किशोर मागटे पाटील, संजय गोटफोडे, संतोष पांडे गणेश अंधारे निलेश निनोरे, तुषार भिरड अमोल गोगे अमोल गीते दिलीप मिश्रा अमोल मोहकार सतीश ढगेअक्षय जोशी गिरीश जोशी जयंत मसने सागर शेगोकार आशिष ढोमणे विवेक भरणे चंदाताई शर्मा, सुमन ताई गावंडे बेबीताई गीते पुनम गीते संगीता बाठे, राखीताई तीविले, गायत्री ताई धुगे यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना करण्यात आली यावेळी वेदपाठी ब्राह्मण हेमंत शर्मा संतोष शुक्ला लोकेश तिवारी सतीश जोशी, विशेष पूजा केली. यावेळी महाराष्ट्रातील संतांची माहिती, थोर पुरुष माहिती, प्रदूषण पर्यावरण, संतुलन योगासन, खेळांची माहिती, पाण्याचे महत्व व बचत या संदर्भाची पुस्तिका वेगवेगळ्या व शैक्षणिक साहित्य महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी कन्या पूजन करून भारतीय जनता पक्षाने नेत्यांनी पर्वावर त्यांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष साखरे डॉक्टर संजय ढोरेमनोज शाहू, विकी ठाकूर प्रवीण शुक्ला दिनेश मोरे सुनील बाठे, विकी भिसे अभिषेक भगत मंगेश सावरकर किशोर पाटील सदा जायभाय कुणाल डोईफोडे गजानन घाटे गजानन वाडेकर सुमित ढोरे किरण जवेरी, बबलू सावंत सागर शेगोकार, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

    Post Views:  238


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व