मा. कृषीमंत्री शरद पवार साहेब यांच्याशी साधला संवाद
पुणे येथे महाऑरगॅनिक सभेला योगेश सरप यांची उपस्थिती ..
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Jun 2024, 8:35 AM
पुणे - 23 जून पुणे येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात आयोजित महाऑरगॅनिक अँड रेसिडू फ्री फार्मर्स असोसिएशनला मोर्फ सभेला महाराष्ट्राचे संचालक अकोला व जिल्हाध्यक्ष व सभासद म्हणून अकोल्या जवळील कान्हेरी सरप येथील मधुरत्न जैविक कृषी फार्मचे अध्यक्ष व कृषी भूषण सेंद्रिय शेती तज्ञ श्री.मधुकर सरप यांचे विचार माडण्यासाठी प्रतिनिधी म्हणून योगेश सरप यांची उपस्थिती होती सदरू कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.श्री.शरद पवार साहेब तसेच मोर्फा चे व्यवस्थापकीय मार्गदर्शक मा.श्री. योगेंद्र दादा पवार मोर्फा अध्यक्ष श्री.अंकुशदादा पडोळे सचिव मा.श्री प्रल्हाद वरे काका उपाध्यक्ष सौ.स्वाती शिगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्राचे संचालक म्हणून मा.श्री.शरद पवार साहेब यांनी माझ्याशी संवाद साधून अकोला जिल्हातील अडीअडचणी विषयी माहिती विचारली त्या वेळेस मी त्यांना वऱ्हाड आणि सोन्याची कराड म्हणून आमचा विदर्भ व अकोला जिल्हा ओळखायचा आता ती ओळख संपुष्टात येत आहे.

लोप पावत आहे शेतकरी बंधूंनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला कापूस पिकवला असता त्यांच्या मालाल भाव मिळत नाही,सोयाबीन पेरले असता त्याला भाव मिळत नाही विदर्भातील प्रत्येक शेतकऱ्याकडे सोयाबीनचे भंडार भरलेले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन उत्पादन होत असून प्रत्येक शेतकऱ्याकडे आज रोजी सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे विज,पाणी, शेतीमालाला भाव त्यामुळे प्रत्येक बाबीसाठी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो अकोला जिल्ह्यातील शेतकरी हवाल दिल झालेला आहे अकोल्या जिल्ह्यातील सेंद्रिय शेतकरी उत्पादक गट,कुषी फार्मर प्रोड्युसर कंपनी, महिला शेतकरी गट हे खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय भाजीपाला , सेंद्रिय धान्य खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन करून विक्री करत आहेत पण त्यांच्यासाठी कोणत्याच प्रकारचे शासन स्तरावर मार्केटिंग करण्याकरीता जागा आज पर्यत उपलब्ध करता आली नाही . जागा उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना. विकण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागतो सर्व राजकीय पक्षांनी राजकारण न करता फार्मर प्रोड्युसर कंपनी व सेंद्रीय शेतकरी उत्पादक गट यांना बळकटी द्यावी विशेष मागणी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असणाऱ्या सुविधा पाणी लाईन त्यांच्या ऊसाला भाव ह्या सर्व सुविधा विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष करून अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना सुख सुविधा व मालाला भाव ,वन्य प्राण्यापासून शेती चे सवरक्षण पुरविण्यात यावे त्यांची आर्थिक प्रगती उंचावी सर्वच राजकीय पक्षांनी याकडे लक्ष द्यावे अशी विनंती योगेश सरप यांनी माहा.ऑरगॅनिक सभेला उपस्थित असताना विनंती केली
Post Views: 176