माफ करा मोदीजी तुमची सात वर्ष सेवा पाहिली


 Sanjay M. Deshmukh  29 Nov 2021, 11:55 AM
   

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या विधानावर लोक तुटून पडले आहेत. त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. आज रविवारी (ता.२८) मन की बात या कार्यक्रमात मोदी म्हणाले, की मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत राहु इच्छित नाही. मला फक्त सेवेत राहायचे आहे. माझ्यासाठी पंतप्रधानपद सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आहे. ते आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्याशी बोलत होते. मोदींच्या या वक्तव्यावर बाबू गणपत म्हणतात, की माफ करा मोदीजी तुमची सात वर्ष सेवा पाहिली आहे. तसे या सात वर्षांमध्ये तुम्ही अदानी, अंबानींची खूप सेवा केली आहे. तसेच मेवाही खूप कमावले असतील.
या मेव्यातून एखादी बिगर शासकीय संस्था (एनजीओ) सुरु करा आणि आता जनतेची सेवा करा. त्यामुळे त्यांच्याबरोबर केलेल्या विश्वासघाताचे पाप धूऊन जाईल.

स्क्रीनशाॅट काढून ठेवा, असा उपरोधक टोला शुभम कुमार शुक्ला यांनी लगावला आहे. डोळ्यात पाणी आले, एकच हृदय आहे मोदीजी, असे रवि म्हणाले. अजय गुर्जर यांनी तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यायचा सल्ला दिला आहे. पीएम साहेब तर हिमालयातून वापस का आले तिथे ठिक होते, असे विल्यम जाॅन म्हटले आहे. दिलेर सिंग राजपूत म्हणतात, की भावा मग झोळी घ्या आणि निघा.

    Post Views:  227


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व