उज्ज्वला येरणवाड यांना समाजशास्त्र विषयात पिएचडी
देगलूर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर येथील समाजशास्त्र विभागातर्फे संशोधिका उज्वला हणमंत यरणवाड (दिवटीवाड) यांना समाजशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी डॉ.संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली “नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी गोंडांच्या शैक्षणिक समस्या व सद्यस्थिती” हा संशोधन विषय घेऊन आपला शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. संशोधिका उज्वला यरणवाड या शरण शांतीवर्धक हायस्कूल, कुन्मारपल्ली या शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून राहणार येडूर तालुका देगलूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असलेली विद्यावाचस्पती (Ph.D) पदवी मिळवली असून याबद्दल त्यांचे वडील हणमंत इरप्पा यरणवाड, केवळबाई हणमंत यरणवाड ,बहिण आशाताई यरणवाड,संगीता यरणवाड, भाऊ डॉ. पांडुरंग यरणवाड तसेच त्यांचे पती डॉ. तानाजी दिवटीवाड व वरिष्ठ पत्रकार भीमराव येरनवाड हाणेगाव सर्कल, महादेव यरणवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
Post Views: 278