प्रौढांसाठी जिल्ह्यात बीसीजी लसीकरण मोहिम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Sep 2024, 8:47 AM
   

अकोला : जिल्ह्यातील 60 वर्षांवरील, तसेच आजाराची जोखीम असलेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना बीसीजी लसीकरण मोहिम जिल्ह्यात दि. 3 सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांनी समन्वयाने ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात 60 वर्षांवरील सर्वांना, तसेच 18 वर्षांवरील मधुमेही, धुम्रपान करणारे किंवा ज्यांचा बॉडी मास्क इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे, तसेच मागील 5 वर्षांतील क्षयरोगमुक्त नागरिक, मागील 3 वर्षांतील क्षयरूग्ण व्यक्तीच्या सहवासातील नागरिक आदींना ही लस दिली जाणार आहे. साधारणत: जिल्ह्यात 61 हजार व महापालिकेच्या क्षेत्रात 9 हजार व्यक्तींना लस दिली जाईल. 
मोहिमेसाठी यंत्रणा सुसज्ज आहे. समन्वय ठेवून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती वैष्णवी यांनी दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, उपमुख्य कार्य अधिकारी राजश्री कोलखेडे, श्री. परिहार, डॉ. अनुप चौधरी, डॉ. विनोद करंजीकर, डॉ. मनीष शर्मा, डॉ. नितीन लहाने, डॉ. राधा जोगी आदी उपस्थित होते.

    Post Views:  150


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व